जामखेडचे पत्रकार मोहीद्दीन तांबोळी हे संविधान गैरव पुरस्काराने सन्मानित
जामखेड प्रतिनिधी
गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारीता क्षेत्रात काम करत आसलेले जामखेड चे पत्रकार मोहीद्दीन तांबोळी यांना नुकतेच संविधान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच बरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना देखील या संविधान गौरव पुरस्काराने सन्मानित आले.
मोहिद्दीन तांबोळी हे दैनिक पुण्यनगरी चे जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून गेल्या आनेक वर्षापासून काम करतात. पत्रकारीतेच्या माध्यमातून पत्रकार मोहिद्दीन तांबोळी हे निर्भीड पत्रकारीता करत असुन ते सतत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत सालाबाद प्रमाणे जामखेड शहरात प्रजासत्ताक दिनी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांच्या आयोजनाखाली संविधान महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पत्रकार मोहीद्दीन तांबोळी यांना सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, मुख्यअधिकारी अजय साळवे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अँड अरुण जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, नगरसेवक अमित चिंतामणी, बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, अशोक आव्हाड, पंडित मोरे, प्रका सदाफुले, प्रभाकर घायतडक, नामदेव गंगावणे, कदम गुरुजी, प्रभाकर सदाफुले, मुरलीधर सदाफुले, सुनील जावळे, मुकुंद घायतडक, राहुल आहेर, सुरेखा सदाफुले, मालन घायतडक, वस्तीगृहाच्या अधीक्षक शोभा कांबळे, ज्योती जावळे, कुसुम साळवे, रोहिणी सदाफुले यांच्या उपस्थित संविधान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार मोहिद्दीन तांबोळी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल नुकतेच आ.प्रा राम शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला. तसेच परीसरातील व तालुक्यातील नागरीक व मित्र परीवारीवाराकडुन शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
याच बरोबर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा देखिल या संविधान महोत्सवात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या मध्ये सामाजिक क्षेत्रातून रमेश गुगळे, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. रोहन टोमके, शैक्षणिक क्षेत्रातून एकनाथ चव्हाण, महिला सामाजिक क्षेत्रातून अरुणा सदाफुले व द्वारका पवार यांचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here