जामखेडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट विरोधात ठेवीदार झाले आक्रमक, दिला आमरण उपोषणाचा इशारा
चार पाच महीन्यांपासून बँकेला टाळे, ग्राहकांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्या
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सो. लि मध्ये गेल्या आनेक महीन्यांपासून हातावर पोट भरणाऱ्या अनेक ठेवीदांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. या मुळे ठेवीदारांनी आक्रमक पवित्रा घेत जामखेड चे तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच येत्या काही दिवसात ठेवीदांचे पैसै मिळेले नाहीत तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील ठेवीदारांनी दिला आहे.
जामखेड येथे बीड येथील कुटे ग्रृप ची ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सो. लि ही शाखा गेल्या आनेक वर्षापासून आहे. या मध्ये अनेक ग्राहकांनी कोट्यावधी रुपये सेव्हिंग व मुदत ठेव पावतीच्या माध्यमातून मोठ्या विश्वासाने ठेवल्या आहेत. मात्र गेल्या चार पाच महीन्यांपासून या ज्ञानराधा मल्टीस्टेटला टाळे लागल्याने गोरगरीब ठेवीदार या मल्टीस्टेटचे उंबरठे झीजवुन थकले आहेत. मात्र तरी देखिल या ठेवीदारांना एक रुपयाही मिळाल नाही.
आखेर याच अनुषंगाने जामखेड चे ॲडव्होकेट एन. आर. राजपुरे यांनी इतर ठेवीदारांना सोबत घेऊन आक्रमक पवित्रा घेत आज गुरवार दि १ फेब्रुवारी २०२४ रोजी जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जामखेड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सो.लि.बीड मध्ये माझे पैसै अडकले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून संबधित अधिकार्यांशी संपर्क करत ओहोत परंतु अधिकारी नॉटरीचेबल आहेत. तसेच बीडच्या इतर वरीष्ठ पदावरील अधिकारी यांनी स्वतःचे पैसै काढुन घेतले आहेत. त्यामुळे आमचा बँकेवर विश्वास राहीला नाही.
याबाबत दि ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंन्त आमचे पैसे मिळाले नाहीत तर ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या विरोधात तालुक्यातील पिडीत ठेविंदारांसह वकील बांधव व वकील संघ जामखेड यांना घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील निवेदनात दिला आहे. या निवेदनावर ॲड .एन. आर. राजपुरे यांच्या सह जवळ जवळ साडेतीनशे ग्राहक व ठेकेदारांच्या सह्या आहेत.