राष्ट्रवादीला खिंडार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पवनराजे राळेभात यांचा कार्यकत्यानसह भाजपमध्ये प्रवेश
जामखेड प्रतिनिधी
जामखेडचे माजी सरपंच कै. महादेव (आप्पा) राळेभात यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पवनराजे राळेभात यांनी नुकताच चौंडी येथे आ. प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनसह भाजपमध्ये प्रवेश केला. पवनराजे राळेभात यांच्या प्रवेशामुळे आ. रोहित पवार यांना हा धक्का मानला जात आहे.
युवा नेते पवनराजे राळेभात हे कै. महादेव (आप्पा) राळेभात यांचे पुत्र आहेत. कै. महादेव (आप्पा) राळेभात हे 25 वर्षे शिवसेना तालुकाप्रमुख या पदावर होते. तसेच ते मार्केट कमीटीचे 15 वर्षे संचालक होते. तर जामखेड ग्रामपंचायत चे 5 वर्षे सरपंच व 10 वर्षे तालुका दुध संघाचे व्हाईस चेअरमन म्हणून काम केले आहे. यानंतर पवनराजे राळेभात यांच्या मातोश्री देखील जामखेड नगरपरिषदेच्या नगरसेविका म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
पवनराजे राळेभात यांनी युवा सेनेचे तालुका अध्यक्षपद देखील भुषवले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते म्हणून पाच वर्षे काम पाहिले आहे. त्यांचा सध्या जामखेड तालुक्यात दांडगा संपर्क आसुन त्यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांन समवेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
प्रवेशा दरम्यान पवनराजे राळेभात यांनी बोलताना सांगितले की देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे. देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तर आ. प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून जामखेड शहराचा विकास करावयाचा आहे. आ. प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्याचा विकास झाला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील काम करणार आहेत. कर्जत जामखेड चे राष्ट्रवादी चे आमदार निवडुन आणण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. मात्र निवडणूक होऊन ते आमदार झाले आणि आम्हाला बाजुला ठेऊन इतरांना जवळ केले आसा देखील आरोप पवनराजे राळेभात यांनी केला आहे.
यावेळी बोलताना आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले की, भाजपाच्या लोकांना त्रास देऊन झालेले प्रवेश पुन्हा स्वगृही परतत आहेत. भाजपामध्ये प्रवेश करणारे कार्यकर्ते मनाने करत आहेत. कोणावरही कसलाही दबाव नाही. तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख व जामखेडचे सरपंच कै. महादेव राळेभात यांनी हिंदुत्वाचा विचार ठेवला आज पुन्हा पवन राळेभात यांनी भाजपाची विचारधारा स्विकारली आहे. पवन राळेभात यांच्या माध्यमातून शहरात विकासाचे चांगले काम करता येणार आहे. आडवा आडवी व खुनशी पद्धतीचे राजकारण भाजपा कधीच करत नाही. विरोधकांनी लोकांना त्रास देत प्रवेश करुन घेतले होते ते प्रवेश आता पुन्हा परतत आहेत.
प्रवेशा दरम्यान भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, रवी सुरवसे, नगरसेवक अमित चिंतामणी, सोमनाथ पाचारणे, बापुराव ढवळे, डॉ. भगवानराव मुरूमकर, ॲड प्रविण सानप, नगरसेवक बिभीषण धनवडे, दादासाहेब रीटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोठरे, संपत (नाना) राळेभात, सोमनाथ राळेभात, अर्जुन म्हेत्रे, अर्चना राळेभात, संजिवनी पाटील, गौतम उतेकर, प्रशांत शिंदे, तात्याराम पोकळे, उद्धव हुलगुंडे, नानासाहेब गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, जाकीर शेख, ज्ञानेश्वर झेंडे, जमीर सय्यद, मोहन मामा गडदे, डॉ. राळेभात यांच्या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here