रस्त्याच्या कामात जो अडथळा निर्माण करेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा -खा.सुजय विखे
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे आंतर कमी होणार नाही. रस्त्याच्या कामात अधिकारी व ठेकेदार यांनी हलगर्जीपणा करु नये, रस्त्याचे काम सुरू असताना जे कोणी अडथळा निर्माण करत असतील त्यांच्यावर ३५३ चे गुन्हे दाखल करा असे आदेश खा.सुजय विखे पाटील यांनी आढावा बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांना दिले.
जामखेड येथे काल दि १० रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या कामा संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार योगेश चंद्रे , महावितरण कंपनीचे अभियंता शरद चेचर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मुख्याधिकारी अजय साळवे, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रा. मधुकर (आबा) राळेभात , जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, दत्तात्रय वारे, माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, राजेंद्र कोठारी, माजी सभापती सुधिर राळेभात, उपसभापती कैलास वराट, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, नगरसेवक अमित चिंतामणी, बिबीशन धनवडे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, विकास राळेभात, निखिल घायतडक , अंकुश ढवळे, अमित जाधव, सलीमभाई तांबोळी, तुषार बोथरा सह राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी रस्त्याबाबत आडचणी मांडताना सांगितले की उरलेला रस्ता एकाबाजुने जे रस्त्याचे काम सुरू आहे ते वेगाने व्हावे तसेच दुसर्या बाजुने रस्ता वहातुकीस व्यवस्थित करण्यात यावा ,चांगल्या दर्जाचा मुरुम टाकावा, रस्त्यावर व नाली बांधकामावर जास्त प्रमाणात पाणी मारावे.
अमोल राळेभात म्हणाले की एस टी स्टॅंन्ड परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते तेथील रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे, यांचबरोबर रस्ता दर्जेदार व्हावा, ठेकेदार यांनी शक्यतो रात्रीच शहरातील काम करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर म्हणाले की बीड रोडवरील रस्त्याचे काम चालू आहे परंतु एक साईट काही प्रमाणात झाली आहे. परंतु खालीवर वाहन धारकांना उतरावे लागत आहे. त्या ठिकाणी आणखी थोडे फार ब्रॅकेट लावले तर लांबूनच कोणत्या साइटला वळलायचे आहे ते वहान धारकांच्या लक्षात येईल. ठेकेदाराने स्वतः कामाकडे लक्ष द्यावे व रस्ता लवकरात लवकर करावा असे मत व्यक्त केले. यानंतर दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, आर्जुन म्हेत्रे व अमित जाधव सह अनेकांनी आपले मते व्यक्त केली.
खा. सुजय विखे पाटील म्हणाले की शहरातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. सत्यावर येणारी सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील कोणाचीही गय केली जाणार नाही. जर कोणी रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करत आसेल तर त्याला आडवा करा, पोलीस प्रशासनाची मदत घेऊन रस्ता कोण अडवत आसेल कींवा दादागिरी कोण करत असेल तर कायदेशीर गुन्हे दाखल करा, राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना प्रथम शहरातुन जाणार्या रस्त्याला प्राधान्य द्या आशा सुचना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या. यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनी सर्व सुचना लक्षात घेऊन शहरातील रस्त्यांचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन खा. सुजय विखे पाटील व नागरिकांना दिल्या.