बजाज फायनान्स च्या वतीने आयोजित लकी ड्रॉ योजनेची उत्साहात सोडत संपन्न
जामखेड प्रतिनिधी
दसरा व दिवाळी निमित्त जामखेड आष्टी व पाटोदा येथिल मोबाईल शॉपी डीलर व बजाज फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आशी लकी ड्रॉ सोडत आयोजित करण्यात आली होती. याची सोडत नुकतीच जामखेड शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या मध्ये इलेक्ट्रीक बाईक सह एकुण वीस बक्षिसे ठेवण्यात आली होती.
दसरा दिवाळी निमित्त जामखेड आष्टी व पाटोदा या ठीकाणी बजाज फायनान्स मार्फत आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ कुपन मध्ये आनेक ग्राहकांनी सहभाग घेतला होता विषेश म्हणजे जामखेड शहरातील आष्टेकर मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत सर्वात जास्त कुपन खरेदी केले. आतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या लकी ड्रॉ कुपन सोडत संपन्न झाली. या लकी ड्रॉ दरम्यान सर्वच ग्राहकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला होता.
या वेळी बजाज फायनान्स चे विभागीय मॅनेजर समिर गीरी सर व जामखेड शाखा मॅनेजर निखिल नरोडे सर तसेच मोबाईल शॉपी चे संचालक सागर आष्टेकर, बाळु रेडेकर, बिबीशन धनवडे, सुनिल जगताप विकास घाडगे, संदीप वडे, सागर सदाफुले, सतिश धोंडे, राज माने, गणेश रुपनर, सुंदर परदेशी, आरुण लटके, संदिप लटके, दिगंबर सातारकर, अजिज मकरानी, श्रीपाद बळे, सोमनाथ पवार, जुनेद बागवान, नासिर बेग, मंगेश आवसरे सह आनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here