अपघात जखमी झालेल्या संदेश कोठारी याचा उपचारादरम्यान मृत्यू, दहा दिवसांपूर्वी झाला होता अपघात
जामखेड प्रतिनिधी
जामखेड चे माजी सरपंच सुनिल कोठारी यांचा मुलगा संदेश कोठारी याचा जळगाव-चांदवड मार्गावर गेल्या दहा दिवसांपुर्वी अपघात झाला होता. त्याच्यावर संभाजीनगर या ठिकाणी उपचार सुरू होते. आखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की जळगाव- चांदवड राज्य मार्गावरील हिंगोणे गावानजीक वळणावर गुरुवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर जामखेड ता. जामखेड येथील रहिवासी संदेश कोठारी यांच्या सह चार जण चारचाकी गाडीने क्रमांक एम.एच. १६ सी.व्ही. २२७७ जळगाव येथून जामखेड येत होते. दरम्यान, हिंगोणे (ता. चाळीसगाव ) जवळील वळणावर अचानक आलेल्या खराब रस्त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी उलटून झाडावर आदळली व मोठा आपघात झाला होता. या अपघातात चारचाकी गाडी उलटल्याने या पुर्वीच अरुण मोरे (४५, रा. घोगरगाव,) याचा जाग्यावरच मृत्यू झाला होता तर संदेश कोठारी सह तीन जण गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी संभाजीनगर या ठिकाणी हलवण्यात आले होते.
संदेश कोठारी याच्यावर गेल्या दहा दिवसांपासून संभाजीनगर येथील खाजगी हॉस्पिटलला उपचार सुरू होते. आखेर उपचारादरम्यान शुक्रवार दि 25 रोजी सायंकाळी त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. संदेश कोठारी हा जामखेड चे माजी सरपंच व प्रसिद्ध व्यापारी सुनिल कोठारी यांचा मुलगा होता. संदेश याच्या मागे एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ (विवाहित) बहीण व आई वडील असा परिवार आहे. त्याच्या अचानक जाण्याच्या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here