रोखठोक जामखेड….

घोडेगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद भास्कर जगताप तर उपसरपंचपदी मुलानी समशद शैकत यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर गावत एकच जल्लोष करण्यात आला.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य रेणुका प्रभु गवळी, चौत्यन्य कीसन भानोसे, गणेश रावसाहेब रावण हे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ व प्रा सचिन गायवळ यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव ग्रामपंचायतीचा विकास करणार आसलेल्याचे घोडेगाव चे नवनिर्वाचित सरपंच शरद जगताप यांनी बोलताना सांगितले. सरपंच शरद जगताप यांना सुचक म्हणून गणेश रावण तर उपसरपंच मुलानी समशद शैकत यांना रेणुका प्रभु गवळी या सुचक म्हणून होत्या.

निवडणुकीत पॅनल निवडून येण्यासाठी व सरपंच निवडीसाठी घोडेगाव चे जालिंदर भोंडवे, लक्ष्मण भांगे, बाळासाहेब कांबळे, विशाल गव्हाळे, आर के सर, जुनेद सय्यद, राजु सय्यद, पप्पू रसुल, शेख जहांगीर, मन्सूरभाई सय्यद, नवनाथ म्हस्के, विक्रम दिवटे, नाना पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळासाहेब लटके व ग्रामसेविका एस एन इंगोले मॅडम यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here