रोखठोक जामखेड…..
गरीब व गरजू रुग्णांना आरोग्य सेवेच्या माध्यमातून चांगली सेवा देण्यात यावी, कारण आरोग्य सेवा केली तर चांगले समाधान मिळते असे मत सौताडा येथील पाडुरंग (देवा) शास्त्री देशमुख यांनी ओम हॉस्पिटल च्या हस्तांतरण सोहळ्या वेळी व्यक्त केले.
ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा विडा उचलणाऱ्या व जामखेड शहराच्या आरोग्यसेवेत नाविन्य पुर्ण सेवा देण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या आधिपत्याखाली आत्याधुनिक सुविधांसह रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी नुकतेच जामखेड शहरातील नावाजलेल्या ओम हॉस्पिटल चा हस्तांतरण सोहळा व उद्घाटन सोहळा पं.पु.पांडुरंग (देवा) शास्त्री देशमुख सौताडा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात, मा सभापती डॉ भगवान मुरूमकर, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, माजी संचालक संदिप ठोंबरे, किशोर अंदुरे, पांडुराजे भोसले, मा नगरअध्यक्ष विकास राळेभात, उमेश राळेभात, ओम हॉस्पिटल चे संचालक भरत दारकुंडे, डॉ अर्जुन शेळके डॉ. सचिनकुमार राजपुत, डॉ सुरज तौर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी डॉ भारत दारकुंडे यांनी बोलताना सांगितले की या हॉस्पिटल ला आता दर अठवड्यातुन र्ह्रदयरोग तज्ञ डॉक्टर श्रीधर बधे, मेंदु व मणक्याचे तज्ञ डॉ अनिरुद्ध पाटील, त्वचारोग तज्ञ डॉ प्राची पाटील, नाक कान घसा तज्ञ डॉ महाविर कटारीया व मुत्ररोग विकार तज्ञ डॉ निरज गांधी हे महीन्याच्या तिसर्या शनिवारी भेटी देणार आहेत. त्यामुळे गरजु रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच हॉस्पिटल मध्ये मल्टिस्पेशलिटी, आय. सी. यु. व ट्रॉमा सेटंर सेवा देखील देण्यात येणार आहेत.