रोखठोक जामखेड….

स्वच्छ जामखेड व सुंदर जामखेड करण्यासाठी लोकसहभागाची चळवळ महत्त्वाची आसते. याच अनुषंगाने ती वाढवण्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर जामखेड मध्ये येत असून स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड साठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.

स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड साठी स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियानात लोकसहभाग वाढवण्यासाठी व शहराचा पहिल्या पाच मधे नंबर आणण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियान जामखेडमध्ये जोरदार सुरू करण्याचे काम सुरू आहे. याची सुरुवात विंचरणा नदीचे सुशोभीकरण करून भव्य दिव्य अशी भगवान शंकराची 21 फुटी उंची असलेली मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. रस्त्याच्याकडेला वृक्षारोपण करण्यात आले आहे. अस्वच्छ, गलिच्छ ही शहराची ओळख पुसून स्वच्छ जामखेड हरित जामखेड ही ओळख निर्माण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यासाठी व जबाबदार नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये पार पाडावेत हेच आपल्या शहरातील नागरिकांना सांगण्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर या दि. 15 रोजी जामखेड मधील ल. ना. होशिंग विद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमासाठी येत आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार रोहित ( दादा.) पवार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनंदाताई पवार, स्वच्छता अभियान महाराष्ट्र प्रणेते भारत आप्पा पाटील, व प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर या आहेत. कार्यक्रमाचे आयोजक मुख्याधिकारी जामखेड नगरपरिषद मिनीनाथ दंडवते, प्रशासक नगरपरिषद अर्चना नष्टे या आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here