पन्नास दिवसांच्या मुदतीनंतर धनगर समाजाच्या अंमलबजावणी करण्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिले अश्वासन  
आखेर लेखी आश्वासनानंतर २१ दिवसानी चौंडी येथिल उपोषण मागे
जामखेड प्रतिनिधी
चौंडी येथे गेल्या २१ दिवसान पासुन सुरु आसलेले आमरण उपोषण मंत्री गिरिश महाजन यांच्या मध्यस्थीने दोन तासांच्या चर्चा नंतर मागे घेण्यात आले. पन्नास दिवसांच्या मुदतीचे लेखी आश्वासन दिले आसुन पुढील पन्नास दिवसात धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार असल्याचे लेखी आश्वासन मंत्री गिरिश महाजन यांनी दिल्यानंतर सदरचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
आ.प्रा.राम शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आ.प्रकाश शेंडगे, माजी.आ. रमेश शेंडगे , नाना देवकाते पाटील, प्रा . शिवाजीराव बंडगर, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, तहसीलदार विशाल नाईकवाडे ,पोलिस निरीक्षक महेश पाटील उपस्थित होते.
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमल बजावणी करावी, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मगावी सुरू आसलेल्या उपोषणाचा आज २१ वा दिवस होता.
यशवंत सेनेच्या वतीने सुरेश बंडगर व आण्णासाहेब रूपनवर हे उपोषणास बसले आहेत. मंबई येथील बैठक निष्फळ ठरल्यानंतर हे आमरण उपोषण सुरूच होते मात्र यावर अद्याप तोडगा निघाला नव्हता. आज दि २६ सप्टेंबर रोजी पुन्हा दुसर्‍यांदा सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे चौंडी येथिल उपोषणावर तोडगा काढण्यासाठी आले होते आखेर उपोषण कर्त्यांशी चर्चा सकारात्मक झाल्यावर लेखी आश्वासनानंतर २१ व्या उपोषण मागे घेण्यात आले .
यावेळी मंत्री गिरिश महाजन पुढे बोलताना म्हणाले की पन्नास दिवसात आडचणी दुर करु सर्व माहिती जमा करुन या बाबत आरक्षणाचा मार्ग कसा काढता येईल या संदर्भात सरकारशी चर्चा करु. सरकार आतिशय सकारात्मक आहे. तांत्रिक गोष्टी दुर करायच्या आहेत .आपली मागणी न्यायीक आहे. तांत्रिक गोष्टी आहेत त्या कशा सोडवल्या जातील यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोबत बैठक घेऊन मार्ग काढु. सरकारने अतिशय सकारात्मक पाऊल उचलले आहे. मी देखील दुसर्‍यांना मी या ठीकाणी आलो आहे चर्चा सकारात्मक झाली त्यामुळे त्यांनी आज उपोषण मागे घेतले आहे. आरक्षण दिले आणि कोर्टाने फेटाळले आसे आरक्षण द्यायचे नाही तर टीकनारे आरक्षण द्यायचे आहे आसे देखील गिरीश महाजन म्हणाले.
एस टी चे सर्टिफिकेट जेंव्हा आपल्या हातात पडेल त्या दिवशी खरा लढा आपण जिंकणार आहोत. पन्नास दिवसांची मुदत सरकारने मागितली आहे. मात्र तोपर्यंत रस्ता रोको, साखळी उपोषण सुरूच ठेवणार आहेत ७० वर्षे वाट पाहीली आता पन्नास दिवस वाट पाहु. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या फोनवर बोलने झाले आहे. आम्ही सर्व आंदोलने लोकशाही मार्गाने करणार आहेत. आंदोलन जरी स्थगित केले आसले तरी पुढील पन्नास दिवसात सर्टिफिकेट हतात मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या काळात हा धनगर समाज हा लढा सुरूच ठेवणार आहे. आशी माहिती यशवंत सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या एकविसाव्या दिवसांपासून उपोषणास्थळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे (बारामती), अक्षय शिंदे (चौंडी ) गोविंद नरवटे (लातुर), समाधान पाटील (जळगाव), नितीन धायगुडे (नातेपुते), दादासाहेब केसकर (दौंड) स्वप्निल मेमाने (जेजुरी) किरण धालपे (इंदापुर), बाळा गायके (बिड) व चौंडी चे सरपंच सुनील उबाळे उपस्थित होते.
चौकट
पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा.सुजय विखे यांच्या विरोधात दिल्या घोषणा
मंत्री गिरिश महाजन हे चौंडी येथिल दुपारी दाखल झाले. यावेळी दोन तास फोनवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा सुरु असतानाच उपस्थित धनगर बांधवांनी आक्रमक होत उपोषणाकडे पाठ फीरवल्याने खा.सुजय विखे पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध केला. यावेळी सरकार च्या विरोधात देखील घोषणा देत धनगर बांधवांनी आरक्षणाची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here