


तुमचा आर्शिवाद कमी पडला, मी नाराज नाही, मैदान सुरू होणार आहे काम करणाऱ्यांना निवडुन द्या – सभापती प्रा.राम शिंदे.
अमित चिंतामणी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ओपन गरबा दांडियास महीलांचा उस्फुर्त प्रतिसाद
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराला अडीचशे कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना आणली मात्र विधान सभेच्या निवडणुकीत तुमचा आशिर्वाद कमी पडला. तरी देखील मी तुमच्यावर नाराज नाही. येणार्या कालखंडात मैदान सुरू होणार आहे. हात जोडुन विनंती करतो काम करणाऱ्यांना निवडुन द्या असे भावनिक आवाहन सभापती प्रा.राम शिंदे यांनी जामखेड येथील ओपन गरबा दांडीया कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

सालाबाद प्रमाणे नवरात्रोत्सव व कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने नगरसेवक अमित चिंतामणी हे ओपन गरबा दांडीयाचे आयोजन करीत असतात. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे या वर्षीचे अकरावे वर्षे आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सीने अभिनेत्री प्राजक्त माळी व सभापती प्रा.राम शिंदे हे उपस्थित होते. याप्रसंगी जेष्ठनेते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, सभापती शरद कार्ले, भाजपा मंडल अध्यक्ष बापूराव ढवळे, पवन राळेभात, महेश निमोणकर, पांडुरंग उबाळे, गुलशन अंधारे, बाजीराव गोपाळघरे, पोपटनाना राळेभात, मनोज कुलकर्णी, राहुल बेदमुथा, मोहन पवार, विकी सदाफुले, राहुल उगले, उल्हास माने, संतोष गव्हाळे, गणेश डोंगरे, गणेश राळेभात, ॲड. प्रवीण सानप, तात्याराम पोकळे, बापूसाहेब गायकवाड, जालिंदर चव्हाण, बापूसाहेब गायकवाड, अर्जुन म्हेत्रे, ॲड. संजय पारे, कांतीलाल वराट, डॉ. विठ्ठल राळेभात, प्रवीण चोरडिया, गोरख घनवट, भरत जगदाळे यांच्यासह आदी पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते, नागरीक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सभापती प्रा.राम शिंदे पुढे बोलताना म्हणाले की सध्या जामखेड शहराला नऊ दिवसाला पाणी मिळत आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे, त्यामुळे या पाण्याला आनखी उशीर होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या नगरपरिषदेला आर्शिवाद देऊन माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. जामखेड शहरातील सर्व कामे मार्गी लावायची आहेत तसेच पाणीपुरवठा व ड्रेनेज लाईन चे काम देखील पुर्ण झाल्यावर जामखेड शहरातील सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रेटने जोडण्यासाठी मोठा प्रॉजेक्ट जामखेड शहरासाठी आणायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपरिषदेला साथ द्या व कामे करणार्यांनाच निवडुन द्या असे आवाहन केले आहे. अमित चिंतामणी हे गेल्या अकरा वर्षापासून या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात चांगले नियोजन करतात त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना नागरिक व महीला चांगला प्रतिसाद देत असतात.

यावेळी सिनेअभिनेत्री प्राजक्त माळी म्हणाल्या की या कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीत व गणपती आरतीने केली हे कैतुकास्पद आहे. नगरसेवक अमित चिंतामणी धार्मिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करतात त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना यश मिळते. प्रत्येकांने आपले कुटुंब आनंदी ठेवले पाहिजे, कारण घरातील कर्ता पुरुष सुखी तर कुटुंब सुखी असते. विषेश म्हणजे कुटुंब सावरण्याचे काम या महीला करीत असतात त्यामुळे महीलांनी नेहमी आनंदी राहीले पाहिजे. कारण तुम्ही आनंदी तर कुटुंब आनंदी आणि कुटुंब आनंदी तर समाज आनंदी रहातो.
यावेळी बोलताना नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले की, अकरा वर्षापूर्वी आम्ही दोनशे महिलांवर आम्ही कार्यक्रम सुरू केला आता पाच हजार पेक्षा जास्त महिला उपस्थित आहेत. दरवर्षी असाच प्रतिसाद मिळत आहे. हे सर्व सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मैत्री निभावणारे नेते म्हणून शिंदे यांची ख्याती आहे. आजही आपल्या जुन्या मित्रांना शिंदे साहेब विसरत नाहीत. यामुळे आम्ही पण जमिनीवर काम करत आहोत. गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात आम्ही सतत असतो. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे यांनीही शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गरबा दांडिया चे देखील उत्कृष्ट नियोजन करण्यात आलेले होते, ज्यामध्ये हजारो युवक – युवतींसह सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उत्सवाचे वातावरण आनंद, भक्ती व उत्साहाने भारावून गेलेले होते.



