जामखेडच्या संत निरंकारी मंडळातर्फे श्रावणी सोमवार निमित्त नागेश्वर मंदिर येथे केले महाप्रसादाचे वाटप
जामखेड प्रतिनिधी
नागेश्वर यात्रेनिमित्त व श्रावणी सोमवार निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी संत निरंकारी मंडळ र.जी .दिल्ली शाखा जामखेड यांच्या वतीने सेवादल स्वयंसेवका मार्फत महाप्रसाद वाटप करण्यात आले या नंतर मंडळाच्या वतीने मंदिर परीसरातील स्वच्छता करण्यात आली .

 

जामखेड येथील संत निरंकारी मंडळ र.जी दिल्ली शाखा जामखेड हे नेहमीच समाजउपयोगी कार्यामध्ये आग्रेसर आसते. त्यामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान सारखे स्तुत्य उपक्रम नेहमी राबवत आसतात . जामखेड चे ग्रामदैवत आसलेल्या नागेश्वर यात्रेनिमित्त नागेश्वर मंदिरात आज श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती .याच अनुषंगाने यावर्षी श्रावणी सोमवार निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी संत निरंकारी मंडळ र.जी .दिल्ली शाखा जामखेड यांच्या वतीने सेवादल स्वयंसेवका मार्फत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यानंतर मंदिर परीसरातील स्वच्छता करण्यात आली .

यावेळी जामखेड शाखेचे मुखी अमितशेठ गंभीर, धीरज भोसले, भरत देडे, वैभव राळेभात, भुषण राळेभात, गणेश पोकळे, रवी जमदाडे, शाम जमदाडे, ओम सुर्यवंशी, वंदनाताई राळेभात, वैशालीताई राळेभात, अलकाताई सुर्यवंशी हे सेवेकरी भक्तगण उपस्थित होते .

यानंतर नागेश्वर उत्सव समितीच्या वतीने सर्व सेवेकरी मंडळीचे आभार मानण्यात आले. दर रविवारी 11 ते 1 यावेळेस शेटे मंगल कार्यालय या ठिकाणी सत्संग भरविण्यात येते याचा देखील सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन अमित शेठ गंभीर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here