संभाजीनगर येथे झालेल्या राज्य सॅम्बो स्पर्धेमध्ये श्रेयस वराटला सुवर्ण पदक
जामखेड प्रतिनिधी
सॅम्बो असोशियशन ऑफ महाराष्ट्र च्या मान्यतेने संभाजीनगर जिल्हा सॅम्बो असोशियशन आयोजित विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी सब-ज्युनिअर गटामध्ये आयडियल स्पोर्टस् अकॅडमी ,जामखेड चा खेळाडू श्रेयस सुदाम वराट याने सुवर्णपदक मिळविले आहे. त्याला प्रशिक्षक प्रा.लक्ष्मण उदमले, शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्यावर संपूर्ण जामखेड तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनच्या वतीने जुलै महिन्यात अमरावती येथे राज्यस्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर वुशु अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा संघामध्ये जामखेडचे आठ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये आयडियल स्पोर्ट अकॅडमी जामखेडचे खेळाडू ज्युनियर गटामध्ये अदित्य आजिनाथ जायभायला सुवर्ण पदक तर सब-ज्युनियर गटामध्ये श्रेयस सुदाम वराट ला रौप्य पदक मिळाले होते.

आता सॅम्बो असोशियशन ऑफ महाराष्ट्र च्या मान्यतेने औरंगाबाद जिल्हा सॅम्बो असोशियशन आयोजित विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये श्रेयस वराटने सुवर्ण पदक मिळवले आहे. यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here