

अमित चिंतामणी मित्रमंडळाच्या वतीने गणेश मंडळाचे स्वागत, अकरा वर्षापासून स्तुत्य उपक्रम सुरू
जामखेड प्रतिनिधी
कार्यतत्पर नगरसेवक, तसेच नेहमीच जनसामान्यांच्या सेवेत असणारे अमित चिंतामणी हे गेल्या अकरा वर्षापासून गणेश विसर्जन मिरवणुकीतील सर्व गणेश भक्तांचे मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहेत. कालही मोठ्या भक्तीभावाने शहरातील गणेश मंडळाचे स्वागत करण्यात आले.

नगरसेवक अमित चिंतामणी यांनी विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागासह शहरात एक कामाचा ठसा उमटवला आहे. दर्जेदार कामे करण्यात ते अग्रेसर असतात. आपल्या प्रभागाचा चेहरामोहरा बदलला आहे. जामखेड शहरातील गणेश मंडळांनी वाजत गाजत विसर्जन मिरवणूकी काढल्या होत्या. गणेश मंडळे ही शहरातील शनिचौक याठिकाणी आल्यावर नगरसेवक अमित चिंतामणी व इतर मान्यवर हे मंडळाचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करीत होते. त्यांच्या या कामाचे सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिततीचे सभापती शरद कार्ले, प्रा. मधुकर राळेभात, भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशीद, युवा नेते पवन राळेभात, अल्ताफ शेख, राहुल बेदमुथ्था, ॲड. प्रविण सानप, प्रविण चोरडिया, राहुल उगले, गणेश काळे, केदार रसाळ, गुलशन अंधारे, गणेश नेटके यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या अकरा वर्षापासून ते दरवर्षी विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळाचे स्वागत करतात. तसेच गणेश भक्तांना शुभेच्छा देतात. यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते.

चौकट
नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या कडून कोणताही कार्यक्रम असला की, तो दर्जेदारच असतो. विशेष म्हणजे दरवर्षी कोजागरी पौर्णिमा एकदमच हाटके करतात राज्यातील विशेष सेलिब्रिटी ला बोलावून जामखेड करांचे खास मनोरंजन करत असतात जामखेड कर अमित चिंतामणी यांच्या कोजागरी ची वाट पाहत असतात. जामखेड शहरात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात चिंतामणी हे आग्रेसर असतात.





