शेतीच्या वादातून दिली मोटारसायकल पेटवून, एक जणावर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
वडिलांकडून विकत घेतलेली शेतजमीन तु आम्हाला परत का देत नाहीस? या कारणावरून आरोपीने फिर्यादीच्या शेताजवळ लावलेली मोटारसायकल पेटवून दिली या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एका जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, फिर्यादीचे वडील रामभाऊ हजारे यांनी जवळा गावात राहणारे महेबुब गुलाब शेख यांच्या मालकिची जवळा गावात शेतगट नंबर २६५ मध्ये असलेली शेतजमीन १६ वर्षापुर्वी विकत घेतलेली आहे. दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी व त्याचे वडील दोघे जण मोटारसायकलवर जवळा गावच्या शिवारातील शेतात गेले होते. यावेळी तेथे आरोपी नबाब महेबुब शेख रा. जवळा ता. जामखेड हा तेथे आला व फिर्यादी गणेश रामभाऊ हजारे वय २७ वर्षे हल्ली रा. कात्रज कोंढवा रोड टिळक नगर पुणे (मुळ रा. जवळा ता.जामखेड) यास म्हणाला की, तुझ्या वडीलांनी माझ्या वडिलांकडून विकत घेतलेली शेतजमीन आम्हाला तु परत का देत नाहीस असे म्हणून शेता जवळ लावलेली फिर्यादीची मोटारसायकल क्रमांक एम. एच. १२ एस. एच १४६९ ही जाळून टाकून नुकसान केले.
या प्रकरणी गणेश रामभाऊ हजारे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी नबाब महेबुब शेख याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल लोखंडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here