अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून केला अत्याचार, आरोपीस चोवीस तासात पोलिसांन कडुन अटक.
जामखेड प्रतिनिधी
सोशल मिडीयाच्या इन्ट्राग्राम द्वारे ओळख करून मी तुला लाईफटाम संभाळेल, आसे म्हणून शहरातील एका दहावीच्या अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेले व तिच्यावर आरोपीने अत्याचार केला. मात्र जामखेड पोलीसांच्या पथकाने या घटनेचा तपास करत अवघ्या चोवीस तासात आरोपीस अटक करून अल्पवयीन मुलीस आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस कडुन मिळालेली माहिती अशी की जामखेड शहरातील एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची आरोपी अनिकेत सचिन घोडेस्वार, वय १९ वर्षे याच्या सोबत सोशल मिडीयाच्या इन्ट्राग्राम द्वारे ओळख झाली होती. दि १५ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी ही सकाळी आकरा वाजता आपल्या घरातुन बाहेर गेली ती संध्याकाळी परत आलीच नाही. त्यामुळे तीच्या आईवडिलांनी तीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. आखेर दि १६ ऑगस्ट २०२३ रोजी जामखेड पोलीस स्टेशनला आरोपी विरोधात आईने दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
पोलीसांनी आरोपी अनिकेत सचिन घोडेस्वार रा. मिलिंदनगर व पिडीत अल्पवयीन मुलगी हीचा चोवीस तासात शोध घेत घेतला व पाडीत मुलीकडे चौकशी केली असता तीने सांगितले की आरोपीची व माझी सोशल मिडीयाच्या इन्ट्राग्राम द्वारे ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी याने पिडीत मुलगी अल्पवयीन आसुन देखील तीला बीड रोडवरील एमआयडीसी च्या ग्राऊंडवर नेले व मी तुला लाईफ टाईम संभाळेल आसे म्हणून अत्याचार केला. तसेच लेन्हेवाडी गावच्या शिवारातील शेतातामधिल घरामध्ये नेहुन देखील तीच्यावर अत्याचार केला आशी माहिती पिडीत मुलीने पोलिसांना जबाबात दिली.
जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनिल बडे, पो.कॉ सचिन पिरगळ, पो.कॉ विजय सुपेकर व सचिन देवडे यांच्या पथकाने तपास करीत अवघ्या चोवीस आताच्या आत म्हणजे दि १७ ऑगस्ट रोजी पहाटे आरोपीस अटक केली व अल्पवयीन मुलीस आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २१ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सपोनि सुनील बडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here