जामखेड प्रतिनिधी
जामखेड – नगर महामार्गावरील कडा येथील कर्डिले वस्ती जवळ दि १८ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जामखेड येथील पिंपळगाव येथुन लग्न समारंभ आटपून आपल्या गावी परत जाणाऱ्या वऱ्हाडाची ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात वीस जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की कल्याण येथून जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथे लग्नासाठी बावधन ट्रॅव्हल्स ( एम एच ०५ – डी के ६१२५) मधून आले होते. सोमवारी दुपारचा लग्नाचा कार्यक्रम उरकुन परत कल्याणकडे जाताना रात्री आठ वाजता ही ट्रॅव्हल्स जामखेड- नगर महामार्गावरील
रस्त्यावर पलटी झाली या ट्रॅव्हल्सचे चारही चाके पूर्णपणे वरती झाल्याने या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. नगरकडून व आष्टी कडे जाणारी पूर्ण वाहतूक यामुळे बंद झाली होती. जखमींना सरपंच तात्या ढोबळे, संपत सांगळे, बंटी गायकवाड, गणेश चोरडिया, संभाजी ढोबळे, पत्रकार रघुनाथ कर्डीले, जयेश कदम व ग्रामस्थांनी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मतद केली.जखमींवर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे.
जखमीची नावे :- विंघ्नेस श्रावण बनसोडे, महेर श्रवण बनसोडे, श्रवण बनसोडे, कवू भगवान कांबळे, चंची श्रावण बनसोडे, शशिकांत जाधव, विलास डाडर, राजाबाई डाडर, सुनील पवार, सुनीता जाधव, अजय जाधव, धोंडबाई जाधव, बाळू कसबे, विराज जाधव,पवन जाधव, कालिंद जाधव, अनिकेत जाधव, कनिराम राठोड,व चालक सुनील पवार अशी आहेत.