रोखठोक  जामखेड…..

ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार ८० टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत असे सांगतात. हा त्यांचा दावा डोळ्यात धुळफेक करणार आहे. तसेच नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी भाजप सज्ज असुन विधानसभेचा वचपा नगरपरिषद निवडणुकीत काढल्या शिवाय रहाणार नाही असा इशारा आमदार रोहित पवार यांना त्यांचे नाव न घेता माजी मंत्री प्रा राम यांनी लावला.

ग्रामपंचायत निवडणुक निकालांच्या आनुशंगाने माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी चौंडी येथील पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी तालुक्यातील कोणत्या व कीती ग्रामपंचायती कोणाच्या ताब्यात आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी भाजपचे नगराध्यक्ष नामदेव (देवा) राऊत, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, माजी डॉ भगवानराव मुरुमकर, उपसभापती रविंद्र सुरवसे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, सरपंच काकासाहेब धांडे, तालुकाध्यक्ष अजय काशिद, नगरसेवक सोमनाथ राळेभात, युवा मोर्चाचे अध्यक्ष शरद कार्ले, पांडुरंग उबाळे, संजय कार्ले, प्रविण चोरडीया, सरचिटणीस लहु शिंदे, डॉ अल्ताफ शेख, अंकुश शिंदे, पोपट (नाना) राळेभात, शरद हजारे, शाहरूख तांबोळी, नंदकुमार सोशल मिडीया प्रमुख उद्धव हुलगुंडे सह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी मंत्री प्रा राम शिंदे म्हणाले की नुकत्याच ३९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडल्या मात्र या मध्ये ४१७ सदस्य निवडून आले आहेत. यातील २०३ सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे आहेत.२३ ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात आहेत मात्र आमदार रोहित पवार हे ८०% ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत असे वर्तमान पत्रात सांगतात. मात्र आमदारांचा हा दावा डोळ्यात धुळफेक करणारा आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारात आमदार हे विकासाला मत द्या आसे सांगतात मात्र विकास कोठे आहे तो दाखवा असा टोला देखील प्रा राम शिंदे यांनी लावला.

सध्या तालुक्यात विरोधकांकडून धमक्या देणे, उचलुन घेऊन जाणे, पळवा पळवी करणे, असे प्रकार सुरू आहेत. मात्र अशा धमक्यांना आम्ही घाबरनार नाहीत. मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उभा रहाणार नाही याचा खुलासा देखील शिंदे यांनी केला. तसेच जवळ येऊन ठेपलेल्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीत योग्य ते उमेदवार देऊन निवडून आणणार आहेत. नगरपरिषद भाजपच्या ताब्यात घेऊन विधानसभेचा वचपा काढणार असा इशारा देखील माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी रोहित पवार यांना नाव न घेता लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here