रोखठोक जामखेड…
ग्रामपंचायत निवडणुकीत खर्डा, चौंडी साकत, सह बहुतांशी गावात राष्ट्रवादी काँग्रेस ने बाजी मारली आहे. माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या चौंडी ग्रामपंचायत मध्ये आमदार रोहित पवार यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का दायक निकाल लागले आसुन अनेक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यातुन निसटल्या आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आसलेल्या खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी बाजी मारली असुन भाजप चे नेते माजी मंत्री राम शिंदे यांच्या ताब्यातुन खर्डा ग्रामपंचायतीची सत्ता हीसकाऊन घेतली आहे. संपूर्ण जिल्ह्य़ाचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस ने या निवडणुकीत १७ पैकी ११ जगांवर विजय मिळविला तर भाजपला फक्त ६ जागांवर समाधान मानावे लागले. जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दोघांनकडुनही निवडणूक प्रचारा दरम्यान आरोप प्रत्यारोप झाले होते. खर्डा ही ग्रामपंचायत जामखेड तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत ताब्यात आल्याने व सध्या निकालांचा कल राष्ट्रवादी च्या बाजुने लागत आसल्याने आमदार रोहित पवार यांचे वर्चस्व वाढले आहे.
तालुक्यातील चौंडी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. राम शिंदे यांचा पॅनल पराभूत झाला असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील पॅनलला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत.राम शिंदे यांचे पुतणे अक्षय शिंदे व बंधू अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोट बांधली होती.
साकत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा तर भाजपला ४ जागा मिळाल्या आहेत. तर २ ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आल्या आहेत तर या पुर्वी २ जागा बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे साकत ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ची संख्या सात झाली आहे. पंचायत समिती सभापती डॉ भगवान मुरुमकर यांची दहा वर्षीपासून आसलेली सत्ता पल्टी झाली आहे.
पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच बापुराव ढवळे यांच्या पॅनलला अकरा पैकी सहा जागा मिळाल्या आहेत. पाडळी ग्रामपंचायत मध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसला चे नऊ पैकी नऊ जागा मिळाल्या आहेत.