धक्कादायक! पत्नीनेच केला आपल्या पतीचा खून, नंतर रचला पतीच्या हत्येचा बनाव, असं फुटलं बिंग…

पुणे : पुण्याच्या मावळमधील गहुंजे येथे तरुणाच्या हत्येने वेगळ वळण घेतले आहे. वारंवार होत असलेला शारीरिक छळ, मारहाण याला कंटाळून पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झाले आहे. अशी माहिती पिंपरी- चिंचवड पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी हत्या झालेल्या सुरजच्या पत्नीला तळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अगोदर पतीला अज्ञात तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला होता. परंतु, पोलिसांपुढे हा बनाव जास्त काळ टिकू शकला नाही.

सासरी आलेल्या जावयाचा अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने वार करत खून केला होता. ही घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली होती. या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पत्नी अंकिता काळभोर हिने पतीच्या जाचाला कंटाळून ही हत्या केली आहे.

पती सुरज काळभोर हा पत्नी अंकिता हिचा शारीरिक शोषण करायचा. त्याला कंटाळून अंकिता काळभोर हिने हे टोकाचे पाऊल उचललं. सुरुवातीला पतीच्या हत्येचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

शनिवारी रात्री ही सूरज काळभोरने पत्नी अंकिता काळभोरचा शारीरिक छळ केला. मग ती चांगलीच संतापली, या त्रासाला कंटाळून तीने पतीला संपवायचं ठरवलं. यासाठी रविवारी सकाळी अंकिताने पतीला माहेरी म्हणजे गहूंजेला न्ह्यायचं ठरवलं. घरातील सुरा तिने सोबत घेतला.

पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डीतील सुरजच्या घरातून ते सकाळी निघाले. तिथून दोघांनी प्रति शिर्डीत साई बाबांचं दर्शन घेतलं. मग दुपारी गहूंजेतील घरी जायच्या आधी तेथीलचं शेतात पोहचले. पत्नी अंकिताने पती सूरज काळभोर चा गळा चिरला आणि जमिनीवर ढकलून दिले.

त्यानंतर शेतातील टिकाव आणि दगड डोक्यात घातला. आरोपी अंकिताने केलेल्या हल्ल्यात पतीचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती अंकिताकडे केलेल्या चौकशीत समोर आलेली आहे. आधी अंकिताने ही हत्या चार ते पाच अज्ञातांनी केल्याचा बनाव रचला होता. मात्र तिने सांगितलेल्या घटनाक्रमावर पोलिसांना संशय आला आणि उलट तपासणी करतच पत्नीचे बिंग फुटले. तळेगाव पोलिसांनी अंकिता काळभोर ला अटक केलेली आहे.

दीड महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

सूरज काळभोर असं हत्या झालेल्या जावयाचे नाव असून आरोपी पत्नीचे नाव अंकिता काळभोर असं आहे. तळेगाव पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. सूरज आणि अंकिता यांचा दीड महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर सूरज काळभोर त्यांच्या पत्नीसह सासरी आले होते. रविवारी सकाळी शेतात फिरायला गेले असता त्यांची हत्या करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here