

गोळीबारातील गुंड अक्षय उर्फ चिंग्या मोरे याची पोलिसांनी काढली जामखेड शहरातुन धिंड!
जामखेड प्रतिनिधी
जामखेड पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असलेल्या तसेच दोन दिवसापूर्वीच हॉटेलवरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे यांची जामखेड शहरातील रस्त्यावरुन धिंड काढण्यात आली. सदर आरोपी विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, दंगल, दरोडा, खंडणी तसेच आर्म्स अँक्ट अंतर्गत असे मिळून १० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.

जामखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांनान मध्ये वाढ होताना दिसुन येत आहे. शहरात स्वतःला भाई म्हणवून घेणाऱ्यांनी जामखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. याच आनुशंगाने जामखेड शहरात स्वतःला भाई समजणार्या अक्षय उर्फ चिंग्या मोरे यांची शहरातुन धिंड काढली. अक्षय उर्फ चिंग्या मोरे याने मागिल महीन्यात बीड रोडवरील एका हॉटेलवर इतर साथीदारांच्या मदतीने पिस्तुलातून गोळीबार करून फिर्यादीस जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच हॉटेलमधील साहित्य आणि चारचाकी गाडीची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दि ६ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी अक्षय उर्फ चिंग्या मोरे यास अटक केली. वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा बसावा या अनुषंगाने सोमवार दि ९ मार्च २०२६ रोजी दुपारी अक्षय उर्फ चिंग्या मोरे याची जामखेड शहरातील रस्त्यावरुन धिंड काढली. सदर आरोपी विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, दंगल, दरोडा, खंडणी तसेच आर्म्स अँक्ट अंतर्गत असे मिळून १० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गुंड अक्षय उर्फ चिंग्या मोरे याची धिंड काढली या दरम्यान सपोनि वर्षा जाधव, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पो. ना. जितेंद्र सरोदे, आकाश शेवाळे, गणेश काळाणे, कुलदिप घोळवे, गणेश भागडे उपस्थित होते. यावेळी पो.नि. दशरत चौधरी यांनी कोणत्याही गुन्हेगाराची व गुंडाची खैर केली जाणार असा इशारा दिला आहे. तसेच शहरातील नागरिकांनी गुंडाची धिंड काढली त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.




