अहमदनगरमध्ये मिरवणूकीत झळकला औरंगजेबाचा फोटो, नेमकं प्रकरण काय?

अहमदनगरः अहमदनगर शहरातील फकीरवाडा परिसरात हजरत दंबाहरी हजरत यांच्या उरुस निमित्त मुकुंदनगर परिसरातुन चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान या मिरवणुकीत चक्क औरंगजेब याचा फोटो घेऊन नाचण्याचा प्रकार घडला आहे.

विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये AIMIM च्या आंदोलनावेळी असाच प्रकार घडल्याने वातावरण बिघडले होते. दरम्यान आता देखील अहमदनगर AIMIM चे शहरप्रमुख यांनी हातात औरंगजेबचे फोटो घेऊन नाचल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुकुंदनगर परिसरात सूफी संत दमबारा हजारी यांचा दर्गाह आहे. रविवारी या दर्ग्याच उरुस म्हणजे जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी डीजे लावून मिरवणुक काढण्यात आली होती. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल. तर हे मान्य केले जाणार नाही. या देशांमध्ये, महाराष्ट्रामध्ये आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असू शकतात.. कोणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला त्या ठिकाणी माफी नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातही बॅनरवर औरंगजेबाचे छायाचित्र, बॅनरवर लावण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्यानंतर याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here