जामखेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता पदी शशिकांत सुतार हजर

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथे सा.बा.विभागात पुर्वी आसलेले संजय कुमार कांबळे यांची नगर येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी नव्याने रूजू झालेले उपअभियंता शशिकांत सुतार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात उप-अभियंता म्हणुन नुकताच पदभार स्विकारला. त्यामुळे आँफिस मधिल कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच मित्र परिवार, विविध राजकीय पक्ष पदाधिकारी यांनी देखील त्यांची भेट घेऊन स्वागत केले.

पदभार स्विकारताच मित्र परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव; यानिमित्ताने ‘ रयत ‘ च्या नागेश विद्यालयाच्या १९८५ तील गुणवंत आणि विविध क्षेत्रात करिअर करणाऱ्या यशवतांच्या आठवणींना मिळाला उजाळा. या विभागाचा उपअभियंता म्हणून पदभार स्विकारणारे शशिकांत हे जामखेड तालुक्यातील ‘ दुसरे अधिकारी ‘ ठरले आहेत.

शशिकांत सुतार हे १९८५ सालच्या नागेश विद्यालयाचे विद्यार्थी ; दुसऱ्या क्रमांकाचे मार्कस घेऊन स्थापत्य अभियांत्रिकी चे शिक्षण बीड येथून त्यांनी पूर्ण केले. १९८९ ते १९९६ या काळात शशिकांत यांनी पुणे येथील नामांकित बांधाकाम व्यावसायिका सोबत काम केले ; पुढे १९९६ ला सार्वजनिक बांधकाम विभाग , नगर येथे ते रुजू झाले. शाखा अभियंता म्हणून जामखेड, राहूरी, श्रीगोंदा, नगर आणि जामखेड येथे सेवा केली ; २०२२ ला शशिकांत यांना ‘बढती ‘ मिळाली आणि वसई – पालघर येथे ते उप अभियंता म्हणून ते रुजू झाले. यानिमित्ताने जिल्ह्या बाहेर ते पहिल्यांदाच गेले ; मात्र तेथे फार काळ रमले नाहीत.

दरम्यान जामखेड येथील तात्कालीन उपअभियंता संजय कांबळे यांची प्रधानमंत्री ग्राम सडक विभाग, अहमदनगर येथे प्रशासकीय बदली झाली आणि त्यांच्या जागी शशिकांत सुतार यांनी १ जून २०२३ ला ‘ उपअभियंता’ म्हणून पदभार स्विकारला ; सुतार यांच्या येण्याने तालुक्यातील हा पदभार सांभाळणारे ते दुसरे अधिकारी ठरलें आहेत. यापूर्वी मोहरी (ता.जामखेड) येथील रहिवासी ; सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डी.के. इंगळे यांनी
उपअभियंता म्हणून तालुक्यात प्रभावी काम केले होते ; तसेच काम शशिकांत सुतार यांच्याकडून होईल ; अशी जामखेडकरांची माफक अपेक्षा आहे.

शशिकांत हे सेवानिवृत्त सहशिक्षक स्वर्गीय डी.एन. सुतार यांचे चिरंजीव आहेत ; सुतार सरांनी सेवा काळात कोणतेच ‘प्रमोशन’ स्विकारले नाही; जामखेडच्या मुलांना इंग्रजी ‘धडे’ त्यांनी खूप वर्षे रयतच्या नागेश विद्यालयातून दिले ; कडक शिस्तीचे आणि तेवढेच लोकप्रिय ही त्यांची खासियत होती ; जामखेड तालुक्यात निरनिराळ्या क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी चमकले आहेत.

पदभार स्विकारता दरम्यान जामखेड येथिल सार्वजनिक बांधकाम विभागाचे विकास जायकर (रावसाहेब), लखपती रावसाहेब, लास रावसाहेब, पानसरे रावसाहेब, बांगर रावसाहेब, औटी साहेब, जाधव साहेब, बारटक्के साहेब, फरादे साहेब,गिरी साहेब, अखाडे साहेब, शिकारे साहेब आदी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here