Home क्राईम न्यूज बांधखडक येथे कांद्याच्या शेतात अफूची शेती, ६ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त

बांधखडक येथे कांद्याच्या शेतात अफूची शेती, ६ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त

बांधखडक येथे कांद्याच्या शेतात अफूची शेती, ६.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील चापडगाव या ठिकाणी पोलीसांनी अफूच्या शेतीवर कारवाई करण्याची घटना ताजी असतानाच जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील बांधखडक शिवारात कांद्याच्या पिकाच्या आडोशाला प्रतिबंधित अफूची मोठी लागवड उघडकीस आली. खर्डा पोलीसांनी केलेल्या कारवाईत ६ लाख १७ हजार रुपये किमतीची अफुची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी दोन जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील बांधखडक या ठिकाणी सुधाकर एकनाथ वारे व मारुती विश्वनाथ वारे यांनी शेत गट क्र. १९१ व १९२ मधून २२ किलो प्रतीबंधीत आसलेल्या अफूच्या झाडांची लागवड केली होती. ही माहिती खर्डा पोलांना समजली. यानंतर खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि उज्वलसिंग राजपूत यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक गुप्त बातमीदाराच्या सूचनेवरून प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी व खासगी वाहनांमध्ये एक पथक घटनास्थळी दाखल झाले व त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी शेतात कांद्याच्या पिकाच्या आडोशाने अफुची जोपासना केली आसल्याचे निदर्शनास आले.

आरोपींनी गेल्या ३-४ महीन्यांपासुन या झाडांना खते आणि पाणी देऊन त्याचे संवर्धन केले असल्याची कबुली दिली. या छाप्यात सुमारे ६ लाख १७ हजार ७२५ रुपये कीमतीची २२ किलो ५६१ ग्रॅम अफुची झाडे जप्त केली. या प्रकरणी पोलीस हवालदार संदिप धामणे यांच्या फिर्यादीवरून बांधखडक येथिल सुधाकर एकनाथ वारे व मारुती विश्वनाथ वारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेंसिक टीम कर्जत विभागाने घटनास्थळी पुरावे गोळा केले आहेत.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उज्वलसिंग राजपूत, संभाजी शेंडे, संदीप धामणे, गोकुळ इंगवले, प्रविण थोरात, विष्णु आवारे, धनराज बिराजदार, शाम चखाले, बाळू खाडे, अशोक बडे, शशी म्हस्के, मुन्ना शेख, चालक शकिल बेग, संजय गुंड यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सपोनि उज्वलसिंग राजपूत करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!