जामखेड येथै छ. शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक जल्लोषात साजरा

जामखेड प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्यभिषेक जामखेड येथे दरवर्षी प्रमाणे जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच तिथीनुसार साजरा करण्यात आला. राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने विशेष असे महत्त्व होते. त्यामुळे तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यभिषेकाला लागणारे जल हे सप्त नद्या, गडकिल्ले व देशातील विविध तिर्थस्थळांवरुन आणण्यात येते व या जलाने माहाराजांचा अभिषेक करण्यात आला. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या तीन दिवशीय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दि. ३१ मे रोजी संध्याकाळी ७ वा महानाट्य दुसऱ्या दिवशी दि. १ जून रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३५० रक्तदात्यांनी आपले समाजिक दायित्व समजून रक्तदानाचे कर्तव्य बजावत आपले शिवरायांप्रती असलेले दायित्व बजावले तर सायंकाळी ७ ते ११ या वेळेत शाहीर रामानंद उगले यांचा शाहीरी गीतांचा कार्यक्रम पार पडला.

तर जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शुक्रवार दि २ जून रोजी रोजी पहाटे ठिक: ०५.३० वेदमंत्राच्या जयघोषात शिवछत्रपतींच्या मुर्तीवर विविध तिर्थक्षेत्र व गडकिल्ल्यांवरुन आणलेल्या व सप्त नद्यांच्या पवित्र जलांनी अभिषेक करण्यात आला. तसेच दुपारी ठिक ३.००वाजता गणपतीच्या आरतीने मिरवणुकत प्रमुख आकर्षणांपैकी एक असणाऱ्या शिवरायांच्या व शंभुराज्याच्या असलेल्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथुन मिरवणुकीची सुरुवात झाली.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरूजींनी जी शिवाजी व संभाजी महाराजांच्या रक्तगटाची पिढी निर्माण करून देव, देश, व धर्म कार्य हे या कार्यक्रमातुन प्रकर्षाने जाणवले यावेळी शिस्तबद्ध पध्दतीने निघालेल्या मिरवणुकीच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती व त्यापुढे गज नृत्य व धनगरी ढोल पथक हा देखावा होता त्यानंतर लेझीम पथक, केरळ नृत्य पथक, प्रभु श्री राम व हनुमान यांची मूर्ती व विशेष असे आयोध्याचे श्री राम मंदीराची प्रतिकृती असलेले मंदीर हे या मिरवणुकीतील विशेष होते. त्यानंतर मल्ल खांब, लाठीकाठी, हलगी पथक, तसेच देवमामलेदार डि. जे. या सर्व पथकांनी जामखेड व परिसरातील उपस्थित लोकांसमोर अप्रतिम कार्यक्रम सादर करण्यात आले.

या मिरवणुक सोहळ्यास अठरापगड जातीतील लोकांची बहुसंख्येने उपस्थिती होती यातुन सामाजिक एकतेचा संदेश समाजाला देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन शिवराज्यभिषेक सोहळा उत्सव समिती जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात येते. राज्याभिषेकास ३५० वर्ष पूर्ण होत असल्याने आकर्षक देखावे, वाद्यपथकांचे पथके यांचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुक सोहळ्याला जामखेड पोलिसांचे अनमोल सहकार्य लाभले त्यांचे व उपस्थित सर्वांचे आभार समितीच्या वतीने मानण्यात आले.
दरम्यान या निवडणुकीत आ. रोहित पवार लझीम खेळून तर खा. सुजय विखे ढोल वाजवून आपला सहभाग नोंदवला व व आनंद लूटला.

 

चौकट
शिस्त, नियोजन आणि अनुशासन याचा प्रत्यय म्हणजे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचा धारकरी पांडुरंग भोसले व सर्व धारकरी, शिवभक्त यांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी चा जामखेडच्या पावन भुमित संपन्न झालेला शिवराज्याभिषेक उत्सव सोहळा. या सोहळ्यात जवळपास २० ते २५ हजार तरुणाईचची गर्दी शिस्त, नियोजन व अनुशासन तसेच राज्यभिषेक सोहळ्यामध्ये सिनेमातील हिंदी गाणे न वाजवता दर वर्षी फक्त देव, देश व शिवरायांवरील गाणी वाजवले जातात हे विषेश या सर्व गोंष्टीमागे पांडुराजे भोसले यांचे नियोजन व सर्व धारकरी व शिवप्रेमिंची महाराजांवरील आपली श्रध्दा असल्यामुळे हा सोहळा जल्लोशात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here