बाजार समितीच्या निकालाने विरोधकांना जमिनीवर आणले – आ. प्रा राम शिंदे
पै. शरद कार्ले यांचा आ. राम शिंदे यांच्या उपस्थितीत सभापती पदाचा पदभार कार्यक्रम संपन्न .
जामखेड प्रतिनिधी
सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले त्यामुळे सर्व सामान कार्यकर्ताच या विजयाचा शिल्पकार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. झगडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आपण हा विजय खेचून आणला. हा विजय जामखेड पुरता राहिला नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात जे कोणी आपल्या अडीच वर्षांच्या कालखंडात वेगळ्याच अविर्भावात वागत होते ते थेट खालच्या पायरीवर आले. जनतेने जो कौल दिला व हा निकाल लागला. या विजयाने विरोधकांना जमीनवर आणले आहे आसा टोला आ. प्रा राम शिंदे यांनी विरोधकांना लावला आहे.
यावेळी नवनिर्वाचित सभापती व संचालक मंडळाला शुभेच्छा देताना आ. प्रा. राम शिंदे म्हणाले की, अतिशय चांगला व शेतकरीभिमुख कारभार करा. नावलौकिक मिळवा. चांगल्या कामासाठी कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे आपल्या काळात सर्वोच्च व चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. असेही वक्तव्य आ. राम शिंदे यांनी यावेळी केले.
जामखेड बाजार समितीच्या सभापती निवडीत सभापती म्हणून विजयी झालेले नवनिर्वाचित सभापती पै. शरद कार्ले यांचा माजीमंत्री आ. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती पदाचा पदभार कार्यक्रम मोठय़ा उत्साहात संपन्न झाला.
या वेळी भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविंद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशिद, शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख, प्रा. कैलास माने, पं. स. माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, ज्योती क्रांती मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, प्रा. सचिन गायवळ, नगरसेवक अमित चिंतामणी, माजी सभापती गौतम उतेकर, बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक विष्णू भोंडवे, वैजीनाथ पाटील, सचिन घुमरे, डॉ. सिताराम ससाणे, नंदू गोरे, गणेश जगताप, रविंद्र हुलगुंडे, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन गडदे (मामा), भारत उगले, बापुसाहेब ढवळे, पांडुरंग उबाळे, विवेक (बाळू) बोथरा,
काँग्रेसचे राहुल उगले, शहाजी राजे भोसले, बिभीषण धनवडे, बिट्टू मोरे, सोमनाथ राळेभात, गणेश लटके, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, अभिजित राळेभात, संदिप गायकवाड, उध्दव हुलगुंडे, दिगांबर ढवळे, लहु शिंदे, अंकुश शिंदे, प्रवीण चोरडिया, अल्ताफ शेख, गोरक धनवट, रमेश जरे, बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद, किरण मोरे, रामभाऊ काशिद, बाळासाहेब यादव, भाजपा कार्यकर्ते, सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, हमाल, शेतकरी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी आ. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सभापती व सर्व नवनिर्वाचित संचालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
तसेच सभापती शरद कार्ले यांना सभापती खुर्चीवर विराजमान केले. यावेळी पदभार स्विकारत असताना नवनिर्वाचित सभापती म्हणाले की, जामखेड बाजार समीतीचा कारभार करत असताना आ. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सर्वांच्या सहकार्याने पारदर्शक व शेतकरीभिमुख कारभार केला जाईल. शेतकरी व व्यापारी यांना आवश्यक त्यासुविधा उपलब्ध व निर्माण करून दिल्या जातील. यावेळी रविंद्र सुरवसे, प्रा. सचिन गायवळ, अजय काशिद, सचिन घुमरे, डॉ. भगवान मुरुमकर, शहाजी भोसले या मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केले.