भारतीय जैन संघटनेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष पदी अमोल तातेड व सचिव पदी प्रफुल सोळंकी

जामखेड प्रतिनिधी

भारतीय जैन संघटना राज्य अधिवेशन मध्ये अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष पदी अमोल तातेड व जिल्हा सचिव पदी प्रफुल सोळंकी यांची निवड करण्यात आली.

भारतीय जैन संघटना 1985 पासून कार्यरत आहे आतापर्यंत किल्लारी भूकंपग्रस्तांना मदत सामुदायिक विवाह सोहळा जलसंधारणाचे कामे कोरोणा ग्रस्त लोकांना मदत असेल मूल्यवर्धन सारखी शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचे कार्य तसेच सतत विविध सामाजिक शैक्षणिक कार्य करत असते.

अमोल तातेड व प्रफुल सोळंकी यांनी आतापर्यंत तालुका स्तरावर खूप चांगले कार्य केले आहे याची दखल घेऊन संघटनेने नगर दक्षिण जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. यावेळी बोलताना प्रफुल सोळंकी असे म्हणाले 2017 -2018 साली जामखेड तालुक्यामध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यातील जामखेड करांची जीवन वाहिनी असलेला भुतवडा तलाव यातील गाळ काढण्यात आला त्याचबरोबर शिऊर,सावरगाव, देवदैठण येथे मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली तसेच तालुक्यामध्ये आतापर्यंत स्मार्ट गर्ल, बिजनेस गायडन्स,शाळेमध्ये मूल्यवर्धनाचा कार्यक्रम असे बरेच समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येत असतात.

या निवडीमुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांना जिल्हास्तरावर कार्य करण्याची संधी मिळाली आहे त्यांचे विविध क्षेत्रातून कौतुक व स्वागत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here