लग्नात डीजेच्या भन्नाट आवाजात बेभान नाचणे भोवले. DJ च्या आवाजाने तरूणाच्या दोन्ही कानांचे पडदे फाटले.

भंडारा : घरी काकाच्या मुलाचे लग्न होते. लग्नात तो बेभान होऊन नाचत होता. नाचून संपूर्ण वन्हाडी मंडळी थकली, पण तो काही थकला नाही. लग्न संपले, मात्र दोन दिवसानंतरही त्याच्या कानातील डीजेचा आवाज गेला नाही. अखेर आठवड्यानंतर आवाज येणेच बंद झाले. डॉक्टरांच्या तपासणीत त्याचे दोन्ही कानाचे पडदे फाटल्याचे निदान झाले अन् त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मोहाडी तालुक्यातील त्या दुदैवी तरुणाचे नाव नितीन लिल्हारे (३०) रा. सालाई खुर्द असे आहे.

‘आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय…..

‘ हे गीत काही वर्षांपूर्वी आवाजाची तीव्रता नियमांचे उल्लंघन करणारी” तुफान गाजले होते. मात्र आवाज वाढविणे अनेकांच्या जिवावर बेतले आहे. खरेतर डीजेसमोर नृत्य नियमांचे उल्लंघन करणारे आहे. परंतु आवाजाचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र, डीजेच्या बेभान आवाजामुळे काय होऊ शकते, हे सालई खुर्द येथील तरुणासोबत घडलेला प्रकारावरून धडा घेण्यासारखे आहे.

मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द.

२४० डेसिबलपेक्षा अधिक डीजेचा आवाज असतो. त्यामुळे बहिरेपणा येण्याची शक्यता असते. लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना हृदयविकाराचा धक्का येऊ शकतो. अनेकांना हृदयविकाराचा धक्का आला आहे. आवाजाची तीव्रता ही नियमांचे उल्लंघन करणारी असते.

येथील नितीन लिल्हारे यांच्या काकाच्या मुलाचे लग्न होते. नवरदेवाची वरात निघाली आणि त्यानंतर सर्व वऱ्हाड्यांसोबत नितीनही नाचू लागला. संपूर्ण वऱ्हाडी मंडळी थकली; पण अखेरच्या क्षणापर्यंत त्याचे नृत्य सुरूच होते… मात्र सायंकाळनंतर रात्रभर नितीनच्या कानात सारखा डीजेचाच आवाज घुमत होता. हा त्रास एक-दोन दिवसात कमी सांगितले.

आठ दिवस उलटूनह त्याच्या कानातील आवाज कमी झाल्याने शेवटी नितीनने डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याच्या एका कानाच पडदा पूर्णत: फाटल्याने आयुष्यभरासाठी कान कामातून गेला आहे. दुसऱ्या कानालाही २० ते ३० टक्केच आवाज येईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

चौकट

लग्न आणि मिरवणूक असेल तर तरुणाई अक्षरश: बेभान होऊन नृत्य करतात. असेच डीजे डॉल्बीवर ठेका धरून बेभान नाचणे माझ्या अंगलट आले आहे. कायमचा बहिरेपणा भोगावा लागणार आहे.

(नितीन लिल्हारे, सालाई खुर्द)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here