

मोठी बातमी! छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षली हल्ल्यात ११ जवान शहीद; अनेक जण जखमी
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला असून नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयडीच्या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत. या शहीद झालेल्यांमध्ये 10 डीआरजी जवान आहेत, तर एक चालक आहे. स्फोटानंतर परिसर सील करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान पाठवण्यात आले आहेत.

दंतेवाडाच्या अरणपूरमध्ये नक्षलवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी आयडीचा स्फोट करून पोलीस कर्मचाऱ्यांनी भरलेली मिनी बस उडवून दिली. या हल्ल्यात आकरा जवान शहीद झाले आहेत. अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे.

दंतेवाडाच्या अरणपूरमध्ये नक्षलवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी आयडीचा स्फोट करून पोलीस कर्मचाऱ्यांनी भरलेली मिनी बस उडवून दिली. या हल्ल्यात आकरा जवान शहीद झाले आहेत. अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला झाला आहे. यामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल (DRG) दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला झाला. या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवादी आणि जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे.





