कुसडगाव जलजीवन योजनेचा सर्वे नव्याने करा, अन्यथा मोर्चा काढू

जामखेड प्रतिनिधी दि

तालुक्यातील कुसडगाव येथील जलजीवन योजनेचा चुकीचा सर्वे रद्द करून कार्यारंभ आदेश रद्द करावा संपूर्ण गावाला या योजनेचा फायदा होईल,यासाठी कुसडगावचा सर्वे पुन्हा करावा अन्यथा पंचायत समितीवर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा कुसडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर याना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.


यावेळी देण्यात आलेल्या निवेदत म्हटले आहे कि,उपरोक्त संदर्भीय विषयान्वये की, मौजे कुसडगांव येथील जलजीवन मिशन अंतर्गत काही वाड्या वस्त्या समाविष्ठ करण्यात याव्यात त्या खालील प्रमाणे- मौजे कुसडगांव येथील भोगलवाडीसाठी काझेवाडी तलावावरुन विहीर करून त्या वाडीसाठी कायस्वरूपी पाण्याची सुविधा होईल. भोगलवस्ती व लेकुरवाळे वस्ती याठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याठिकाणी २० ते २५ हजार लिटरची स्वतंत्र टाकीची आवश्यकता आहे. कुसडगांव साठी काझेवाडी तलावामधून स्वतंत्र विहीर व ८० हजार लिटरच्या टाकीची आवश्यकता आहे. याविषयी आपल्याला वारंवार अर्ज केलेले आहेत. यात आपण तलावामधुन तरी आपण दिलेला आदेश हा आमच्या मागणी प्रमाणे नसून तो आम्हाला मुळीच मान्य नाही नोंदविलेल्या निरीक्षणामुळे गावाच्या पाण्याची व्यवस्था होत नाही. त्यामुळे काझेवाडी तलावाचा सर्वे करावा अशी वारंवार मागणी करुनसुध्दा आपण टाळाटाळ करत आहात. सदर सर्वे योजना ही ३० वर्षे गावासाठी व वस्त्यासाठी पुन्हा मिळणार नसल्यामुळे आमच्या गावाचे कधीही न भरुन येणारे नुकसान होणार आहे. तरी आपण चुकीच्या पध्दतीने केलेला सर्वे तात्काळ दुरुस्त करून फेर निविदा करुन गावाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.

ठरावानुसार जर फेर निवादा न झाल्यास गावाच्या होणाऱ्या नुकसाणीस आपण स्वतः जबाबदार राहताल. त्यामुळे आमच्या मागणीप्रमाणे, आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व्हे करण्यात यावा. अन्यथा लवकरच पंचायत समिती, कार्यालयावर समोर उपोषण करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे सादर निवेदनावर माजी सरपंच बापूसाहेब कार्ले, कुसडगाव ग्रामपंचायत सरपंच शहाजी गाडे, उपसरपंच रुपसुंदरा वटाणे, माजी सरपंच दत्तात्रय कार्ले, ग्रा.पं.सदस्य वंदना कात्रजकर, अंकुश कात्रजकर, मंजुषा भोगले, मधुकर खरात आदींच्या साह्य आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here