Home ताज्या बातम्या मोठी बातमी! एस टी बस मध्ये महिलांना आजपासून एसटीच्या भाड्यात 50 टक्के...

मोठी बातमी! एस टी बस मध्ये महिलांना आजपासून एसटीच्या भाड्यात 50 टक्के सूट, नवे नियम लागू !

मोठी बातमी! एस टी बस मध्ये महिलांना आजपासून एसटीच्या भाड्यात 50 टक्के सूट, नवे नियम लागू !

मुंबई, 17 मार्च : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये पन्नास टक्के भाड्यात प्रवास करता येणार आहे. आजपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात केली होती. ही योजना आजपासून लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून एक परिपत्रक काढून या योजनेची माहिती देण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे परिपत्रकात?

महाराष्ट्र राज्याच्या सन. 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे.

समाजातील विविध घटकांना लाभ

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते.सदर सवलतीची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होते, असं या पत्राकामध्ये म्हटलं आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!