जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयातील श्याम जाधवरच्या गैरव्यवहाराची जिल्हाशल्य चिकित्सकांनी चौकशी करावी – रमेश (दादा) आजबे.
जामखेड प्रतिनिधी –
गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे कार्यरत असलेला शाम वसंतराव जाधवर प्रयोगशाळा तंत्रज्ञ (आय.सी.टी.सी.) यांच्यावर अनेक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत तसेच रूग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी मागील पंधरा दिवसांपुर्वी जाधवर विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आहे.
इतरही अनेक गैरव्यवहाराचे आरोप त्याच्यावर आहेत. लसीकरण मध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केलेला आहे. दवाखान्यातील अनेक वस्तू परस्पर खाजगी बाजारात विकल्या आहेत. तसेच महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन इतरांना पिस्तूलचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे अशा तक्रारीची जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चौकशी करावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व रूग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश (दादा) आजबे यांनी पत्र पाठवले आहे. वरील सर्व तक्रारी मुळे जाधवर याची कर्जत येथे बदली झाली आहे, तरीही तो जामखेड मध्येच असतो. ग्रामीण रुग्णालयातील एका काँर्टर मध्ये त्याचा पसारा आहे. तो रात्री अपरात्री दारू पिऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पोलीस डिपार्टमेंट, चौकशी समीतीत माझे पाहुणे आहेत माझे कोणीही काहीही करू शकत नाही म्हणून इतर कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करतो अशी अनेकांनी तक्रार केली आहे.
या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करावी व दवाखान्यातील औषधे, इंजेक्शन, फँन, वायर, बॅटरी कोणी कधी विकले याचा मागील चार वर्षातील हिशोब तपासावा अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक घोगरे यांना लिहिलेल्या पत्रात सामाजिक कार्यकर्ते व रूग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश आजबे यांनी म्हटले आहे की, जाधवर हे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रत्येक विभागामध्ये हस्तक्षेप करतात. त्यांनी आतापर्यंत अनेक घोटाळे केलेले आहेत.
1. लसीकरण घोटाळा
कार्यरत जिल्हा परिषदवरुण लस आणणे व दवाखान्यात आणून 1000 रुला विकणे, लसीचे टोकन 1000 रु.ला विकणे ऑनलाइन करण्यासाठी पैसे घेणे यामध्ये लाखो रुपयांमद्धे घोटाळा करण्यात आला आहे.
2. दवाखान्यातील वस्तु चोरणे
रुग्णालयातील औषधे, सलाईन साप चावल्याची लस injection डिलिव्हरी संदर्भातील औषधे एचआयव्ही किट पीपीई किट, कॉट, गाद्या, बेडशीट इ. अनेक वस्तु चोरून खाजगी होस्पिटलला विकल्या आहेत.
3. प्रमाणपत्र देणे रुग्णालयात मृत्यू दाखले, जन्म दाखले, फिटनेस प्रमाणपत्र संदर्भ चिठ्ठी शिक्षक पोलिस यांना मेडिकल बिल काढण्यासाठी देणे कोविड काळात मृत्यू झालेले दाखले खोट्या सह्या करून देणे.
4. नर्सिंग सिस्टर बद्दल रुग्णालयाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिस्टर यांना रुग्णसेवेत अडथळा करणे त्यांना घाणेरडे व अर्वाच शब्दात बोलणे विनाकारण त्रास देणे शिव्या देणे. दारू पिऊन धिंगाणा करणे, रात्रीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये पार्टी करणे. दारू पिणे, आणी इतर स्टाफला त्रास देणे. आशा वर्कर यांना घाण बोलणे या मुळे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी पेशंट येणे बंद झाले आहेत. तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणीसाठी जाऊन cs यांच्या नावाखाली पैसे घेतो. अन्यथा सोनोग्राफी सेंटर बंद करण्याची धमकी देतो. येथे गर्भाची तपासणी करतात म्हणून पेपरला बातमी देतो म्हणून धमकावतो. या मुळे खाजगी दवाखान्यातील डॉक्टर सुद्धा परेशान आहेत.जाधवर हे मार्गील पंधरा वर्षापासून ग्रामीण रुग्णालय जमखेड येथे कार्यरत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटल मधील कोपरा न कोपरा माहीत असल्यामुळे हे रुग्णालयातील सर्व कामांमध्ये हस्तक्षेप करून आर्थिक बाबींमध्ये हस्तक्षेप करतात. दवाखान्यातील कोणतेही अवैध काम करायचे झाल्यास त्यांचे नाव प्रसिद्ध आहे. जाधवर हे खूप मोठे डॉक्टर आहेत असे येथील जनतेला भास झाला आहे. हा दवाखाना मांझाच आहे, मी इथला बॉस आहे, मी मुंडेच्या गावचाआहे, माझे पाहणे मोठ मोठे आहेत, सिव्हिल सर्जन सोबत माझी सेटलमेंट आहे. माझे कोणी काहीही वाकडे करू शकत नाही. असे स्टाफ व आलेल्या लोकांना धमकावतो. ग्रामीण रुग्णालय येथे आलेल्या रुग्णांना खाजंगी हॉस्पिटलमध्ये पाठवतो व संबंधित हॉस्पिटल कडून पैसे घेतो. शिक्षक, पोलीस यांचे मेडिकल बील काढण्यासाठी पैसे घेणे अशा अनेक तक्रारी आहेत. खाजगी दवाखान्यातील रुग्णांचे लॅब रिपोर्ट सरकारी दवाखान्यात करतो व पैसे घेतो.शाम वसंतराव जाधवर यांच्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत, तसेच ग्रामीण रुग्णालयाचे नाव खराब होत आहे. त्याची आता बदली झालेली असतानाही ते रात्री अपरात्री दवाखाना परिसरात येतात. दोन दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयावर दगडफेक झाली यातही कोणाचा हात आहे हे प्रशासनाने तपासावे अशी मागणी होत आहे.