जामखेड चा रेडमॅटिक करणार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ग्रंथालयाचे आगी पासुन संरक्षण

जामखेड प्रतिनिधी

राज्य मध्यवर्ती ग्रंथालय हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे ग्रंथालय असुन तिथे किमान ५ ते ६ लाख पु्स्तकांचे भांडार आहे. जामखेड येथील तौरस एन्टरप्रायझेस ऊत्पादित आगीपासून संरक्षण करणाऱ्या अत्याधुनीक रेडमॅटिक अॅाटोमॅटिक फायर फायटर या उपकरणाची राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाने नुकतीच खरेदी केली.

जामखेड मधे ऊत्पादित होणार्‍या रेडमॅटिक चे ऊत्पादक पंकज शेळके यांनी माहिती देताना सांगितले की,हे उपकरणे अत्यंत उपयोगी असुन ते हाताळण्यास खुपच सोपे आहे. ज्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी हे उपकरण ठेवल्यास काही सेकंदात आग विझते. जिथे यंत्र ठेवलेले आहे अशा ठिकाणी आग लागल्यास ज्वाला या सेंसरला स्पर्श करतात. एकदा सेंसर कार्यान्वित झाले की उपक्रम फुटते.उपक्रम फुटून पावडर बाहेर फवारली जाते. ही पावडर बाहेर पडल्यानंतर आग काही सेकंदात नियंत्रणात येते. त्यामुळे आग पसरत नाही. परिणामी पुढील दुर्घटना टळते. आग विझवणारे हे पूर्णपणे स्वयंचलित उपकरण आहे. जामखेड सारख्या ग्रामीण भागात उत्पादित हे उपकरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ग्रंथालयाचे आगीपासून संरक्षण करणार आहे.या कामी विक्रांतजी तावडे,मयूरजी घाटणेकर,श्रेयस देवडे पा. यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here