कर्जत तालुक्यातील कोपर्डीत बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा आखेर मृत्यू.

कर्जत : कर्जत तालुक्यातील कोपर्डीत बोअरवेलमध्ये पडल्याने पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 11 फूट खाली अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी NDRH च्या पाच पथकांनी प्रयत्न केले. मुलाला रात्री उशिरा बोअरवेलबाहेर काढण्यात यश देखील आले. परंतु चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल साडे आठ तास हा चिमुकला बोअरवेलमध्ये अडकला होता.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा खेळताना सोमवारी (13 मार्च) सायंकाळी सहा वाजता पडला. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव आहे. रात्री अडीच वाजेपर्यंत त्याला बोअरवेलमधून काढण्यासाठी बचावकार्य सुरु होते. एनडीआरएफच्या पाच पथकाकडून हे बचाव कार्य सुरु होते. बोरवेलच्या 15 फूट खोलीवर हा मुलगा असल्याचे जाणवत होते, त्याला वाचवण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले. घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल यांच्यासह महसूल प्रशासन तळ ठोकून होते. मात्र रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात आले, त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी हजारो ऊसतोड मजूर परराज्यातून महाराष्ट्रात ऊसतोडणीसाठी येत असतात. त्याप्रमाणे सागरचे कुटुंब देखील रोजगारासाठी आले होते. कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा हा पाच वर्षांचा मुलगा आहे. हे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील आहे. मुलाच्या मृत्युमुळे ऊसतोडीसाठी इथे आलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

बचावकार्य दरम्यान आ. रोहित पवार यांनी देखील केली मदत

आमदार रोहित पवार यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी प्रशासनाशी संपर्क करून पुणे व नगर येथून NDRF टीम ची रवाना करण्यास सांगितले. आमदार रोहित पवार यांच्या यंत्रणेतील दिनेश कारंडे, श्याम निकाळजे, केशव शेलार यांनी घटनेची तात्परता प्रसंगावधान ओळखून ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर आ. रोहित दादा पवार यांनी फोन करून स्वतःची पोकलेन मशीन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. तसेच गावातील तरुण गणेश लिहिणे व दिनेश सुद्रिक यांच्याही जेसीबी त्या ठिकाणी तत्काळ उपलब्ध झाल्या त्यांनी खोदकामास सुरुवात केली प्रशासनामधील पोलीस अधिकारी प्रांत बीडिओ हे सर्वजण तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. साडेआठच्या दरम्यान पुणे व नगर येथील NDRF ची ही घटनास्थळी आली आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन चालू केली. पुणे इथून तत्काळ प्रा तात्यासाहेब सुद्रिक हे देखील घटनास्थळी साडेनऊच्या दरम्यान आले तसेच आ. रोहित दादा पवार यांच्या सतत संपर्क असल्याने त्यांनी पुणे येथील डिजिटल यंत्रणा कॅमेरा हेही बरोबर पाठवून दिले. पुणे इथून येताना यंत्रणा बरोबरच तात्यासाहेब सुद्रिक घटना स्थळी होते.आ रोहित पवार यांनी पोकलेन मशीन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने खोदकामस सहकार्य झाले. नांदगाव येथील शेजारी सहकारी नितीन विटकर यांचाही ब्लास्टिंग ट्रॅक्टर त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला त्यांनीही खोदकामात चांगले सहकार्य केले एकूण रात्री अडीच वाजेपर्यंत हे खोदकाम चालू होते अखेर NDRF चे टीमला सागर हाती लागला परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. आशी माहिती कोपर्डी येथिल प्रा.तात्यासाहेब सुद्रिक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here