विद्यार्थी दशेत झालेले सन्मान हे उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक- डॉ. सौ. वर्षा मोरे पाटील
‘रत्नदीप’ शैक्षणिक संकुलात जागतिक महिला दिन साजरा
जामखेड : विद्यार्थी दशेत झालेले सन्मान हे उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपले ध्येय सुनिश्चित करून त्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत असे मत डॉ.सौ.वर्षा मोरे यांनी महीला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात प्रभावीपणे काम करून सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील आहेत अशा निवडक महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेमार्फत नियमितपणे सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. यावर्षी जागतिक महिला दिन 2023 साजरा करताना रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील नर्सिंग, फार्मसी, होमिओपॅथिक व आयुर्वेद कॉलेजमध्ये उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या यशस्वी व गुणवंत विद्यार्थीनी व महिला कर्मचारी यांना रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड च्या सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा भास्करराव मोरे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ.सौ.वर्षा भास्करराव मोरे पाटील यांच्यासह प्रा.डॉ.झेबिया शेख, रत्नदीप नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सौ.प्रज्ञा पुजारी, प्रा.डॉ.दिपाली सांगळे, प्रा.डॉ.मनिषा बांगर, प्रा.डॉ.श्रध्दा मुळे, डॉ.सौ.शिंदे, सौ.वर्षा ढेरे,कु.पुजा खडताळे आदी महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डॉ. सौ.वर्षा मोरे म्हणाल्या की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वेगळेपणा असतो पण जो तो वेगळेपणा सिध्द करतो तोच नावलौकिक मिळवतो. आज सन्मानित केलेल्या सर्वच विद्यार्थीनी व महिला कर्मचारी यांनी आपल्या यशातुन आपला वेगळेपणा सिध्द केलेला आहे म्हणून त्या सन्मानास पात्र आहेत. इतर विद्यार्थीनींनी देखील त्यांचे अनुकरण केले पाहिजे असे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी कु.स्नेहल चिंचकर, कु.तेहरीम मेहंदी, कु.शाश्वती कोळी,कु.स्नेहल सांगळे,कु.प्रेरणा झोळे,कु.सबा खान,कु.मर्चंट फातिमा, कु.मयुरी धावडे,कु.सुप्रिया शेवाळकर,कु ऐश्वर्या सुद्रिक,कु. रिदा खतिब,कु.योगिता गवळी, कु.दामिनी तरकसे, कु.सुष्मा यादव, कु.दिपाली बोरसे, कु.वैष्णवी घुले,कु.वैष्णवी शिवाजी पाटील, कु.देवयानी पेटारे,कु.मनिषा गुट्टे, कु.अपेक्षा खुळपे,कु.अश्विनी वायसे,कु.अनुराधा गावडे,कु.प्रगती हुलावळे,कु.प्रतीक्षा बरखडे आदी विद्यार्थीनी प्रतिनिधींचा संस्थेच्या सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा भास्करराव मोरे पाटील व उपस्थित मान्यवरांच्या यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कु.सबा खान, कु.स्नेहल चिंचकर कु.तेहरीम मेंहदी, कु.योगिता गवळी,कु.तरकसे दामिनी,कु.कोमल थोरात आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मयुरी धावडे व कु.सबा खान यांनी केले व आभार कु.अपेक्षा महानवर हीने मानले.
चौकट 1
जागतिक महिला दिनानिमित्त रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलातील बीएएमएस, बीएचएमएस, नर्सिंग व फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीनींचा केलेला सन्मान आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरणादायी आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील हे सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीची पालकाप्रमाणे काळजी घेतात हा या रत्नदीप शैक्षणिक संकुलाचा वेगळेपणा आहे.
कु.योगिता अजिनाथ गवळी
बी.एस्सी नर्सिंग, रत्नदीप नर्सिंग कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड.
चोकट 2
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात असलेली कडक शिस्त व मोबाईल वापर बंदी या बाबी मानसिक बळ वाढवणाऱ्या आहेत. या संकुलात मुलींच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच येथे परीक्षेची उत्तम तयारी करून घेतली जाते.
कु.प्रेरणा संभाजी झोळे
बीएचएमएस, विद्यापीठ प्रतिनिधी,
रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड.
चोकट 3
रत्नदीप शैक्षणिक संकुलात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच आमच्या व्यक्तीमत्व विकासाला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी सातत्याने व नियमितपणे विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी-विद्यार्थीनीना करीयरच्या संथी उपलब्ध करून देण्यात येतात. कु.प्रगती हुलावळे
बी.फार्मसी,रत्नदीप फार्मसी कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड.