

आखेर जामखेड शहरातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास झाली सुरूवात
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातून जाणाऱ्या पंचदेवालय ते शासकीय दुध डेअरी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास आखेर आज दि ८ मार्च पासुन सुरवात झाली आहे. या बाबत व्यावसायिकांना व टपरी धारकांना आपली अतिक्रमणे काढण्यासाठी सात दिवसांत मुदत देण्यात आली ती मुदत संपल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाकडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे.

मागील काही दिवसांपुर्वीच खा. सुजय विखे-पाटील व आ. राम शिंदे यांच्या हस्ते शहरातील खर्डा चौकात या रस्त्याचे भुमीपुजन झाले होते. त्यामुळे हा रस्ता कधी चालु होणार याकडे जामखेड करांचे लक्ष लागले होते. त्या नंतर सात दिवसात अतिक्रमण धारकांनी आपली आतिक्रमण काढुन घ्यावीत यासाठी शहरातील चौकामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाकडून फलक लावण्यात आले होते.

जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याची शासकीय हद्द हि रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फुट) अंतरापर्यंत आहे. रस्ताच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे नियमबाह्य अनधिकृत बांधकाम हे प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने अतिक्रमण धारकांनी सदरचे अतिक्रमण ७ दिवसात (दि.७ मार्च २०२३ पर्यंत) काढून घ्यावीत असा विनंतीवजा आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने काढण्यात आला होता. तसा सुचना फलकच जामखेड शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला लावण्यात आला होता.
आखेर याची मुदत आज दि ८ मार्च २०२३ रोजी संपली होती . शहरातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गास अडथळे ठरणारे झाडे देखील या पुर्वी काढण्यात आली होती. या नंतर मुख्य अडथळा होते ते व्यावसायिक व टपरीधारंकाची अतिक्रमणे यामध्ये सध्या काही टपरीधारंकांनी आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पंचदेवालय पासुनच आज या रस्त्या रुंदीकरणास सुरवात झाली आहे. सदरचा रस्ता दोन्ही बाजुच्या मध्यभागा पासून १५ /१५ मिटर रुंद होणार आहे. रस्ता रुंदीकरणामुळे थोडा त्रास नागरीकांना होणार आसला तरी रस्त्याचे काम पुर्ण झाल्यावर जामखेड शहराच्या वैभवात भर पडणार आहे.






