जामखेड चा उद्याचा आठवडी बाजार सुरू राहील – मंगेश आजबे

जामखेड प्रतिनिधी : जामखेड शहरातील पंचदेवालय ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गावरील युटीलिटी व संबंधित डिव्हायडर एरिया हा कमी करावा म्हणून जामखेड व्यापारी असोसिएशनने उद्या शनिवारी जामखेड बंदची हाक दिली आहे. पण उद्या शनिवार आठवडे बाजार असतो शेतकऱ्यांचा काही माल हा नाशिवंत असतो तो विकणे आवश्यक आहे. तसेच शेळ्या, गुरे यांचाही बाजार आवश्यक आहे. ज्या व्यापाऱ्यांना बंद ठेवायला असेल त्यांनी खुशाल बंद ठेवावा पण शेतीसंबंधी सर्व व्यवहार सुरू राहतील अशी माहिती मंगेश आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जामखेड 548 D अतिक्रमण संदर्भात मीटिंग पार पडली या या मीटिंगमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला व जामखेड शहरातील सर्व टपरीधारक व व्यापाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही याकरिता त्रीव आंदोलन छेडण्याचा इशाराही जामखेड व्यापारी असोसिएशनने तर्फे देण्यात आला होता. यानुसार उद्या बंद पुकारण्यात आला आहे याला आता विरोध होताना दिसत आहे.

शेती संबंधित सर्व व्यवहार सुरू राहतील भाजीपाला बाजार, जनावरांचा बाजार तसेच धान्य खरेदी विक्री व्यवहार सुरू राहतील ज्या व्यापाऱ्यांना बंद ठेवायचा असेल त्यांनी बंद ठेवावा पण आम्ही शेती संबंधित सर्व व्यवहार सुरू ठेवणार आहोत अशी माहिती मंगेश आजबे यांनी दिली. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापला माल विक्री साठी आणावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here