जामखेड वकील संघाचा इ-फायलिंग प्रस्तावाला तीव्र विरोध :कामकाजावर बहिष्कार:काळ्या फिती लावून केला निषेध.
जामखेड प्रतिनिधी दि
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयाचे कामकाज इ-फायलिंग करणे सक्तीचे करण्याबाबत सूचना देण्यात आल्याने वकीलांसह पक्षकारांच्या अडचणीत भर पडणार आहे. याबाबत जामखेड तालुका वकील संघाकडून दोन दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून काळ्या फिती लावून या प्रणालीला विरोध दर्शविण्यात आला. याचबरोबर दि १ फेबुरवारी पासून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
यावेळी जामखेड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश याना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,मा. सर्वोच्च न्यायालय यांनी सर्व न्यायालया मध्ये ई-फाईलिंग सक्तीची केली आहे त्यामुळे न्यायालयात रेग्युलर पद्धतीने दावे दाखल करणे बंद होणार आहे. परंतु ई-फाईलिंग सक्तीची करीत असताना मा. सर्वोच्च न्यायालयाने ग्रामीण भागा मध्ये किंवा तालुका स्तरावरील न्यायालया मध्ये असणाऱ्या तांत्रिक असुविधांचा विचार केलेला नाही.
ई-फाईलिंग ही व्यवस्था किचकट स्वरूपाची असुन त्यामुळे पक्षकारांना न्याया पासुन वंचित ठेवणारी तसेच त्याला न्याय देण्यास दिरंगाई होणारी व खर्चिक बाब आहे. त्याचाच अर्थ पक्षकारांना न्याय नाकारणे असाच होतो. जिल्हा व तालुका स्तरीय ई-फाईलिंगसाठी ज्या तांत्रिक व पायाभुत सुविधा असणे गरजेचे आहे अशी कुठलीही संरचना न्यायालया मध्ये पूर्णतःहा उपलब्ध नाही त्यामुळे न्यायालया मध्ये ई-फाईलिंग करताना वकीलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे वकीलांची व पक्षकारांची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी प्रत्येक न्यायालया मध्ये ई-फाईलिंग करून घेणेचे कामकाज हे न्यायालया मार्फत ई-फाईलिंग करण्याची जबाबदारी वकीलांवर टाकण्यात येवु नये. अथवा पूर्ण तांत्रिक व पायाभुत सुविधा निर्माण केल्या शिवाय न्यायालया मध्ये ई-फाईलिंगचे काम सक्तीचे करू नये. दि.२५ व दि.२७ जानेवारी हे दोन दिवस ई-फाईलिंगला विरोध म्हूणन वकील संघाचा एक ही सदस्य सहभागी होणार नाही.
दोन्हीही दिवस वकील संघाचा प्रत्येक सदस्य लालफिती जावुन निषेध नोंदवणार आहे. वकील संघ त्यानंतर दि.०१/०२/२०२३ ई-फाईलिंगला विरोध नोंदविण्यासाठी आंदोलनाचा पर्याय सदस्य पासुन हाताळणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष अॅड संग्राम पोले,उपाध्यक्ष अमोल जगताप, सचिव ई ए पठाण, टी एस पवार, हर्षल डोके, प्रमोद राऊत, पी व्ही गोले, ए के शेख, ए बी कोरे, पी व्ही सानप, जी एस पाटील, एस आर पवार,यांच्यासह वकील संघाच्या सदस्यांच्या साह्य आहेत.