कालिका पोदार लर्न स्कूल जामखेड येथे प्रजासत्ताक दिन साजरा केला.

जामखेड (प्रतिनिधी) कालिका पोदार लर्न स्कूल जामखेड येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

विद्यार्थ्यांनी एकतेच्या भावनेचा,गौरव आणि उत्सव साजरा करण्यात अभिमान बाळगला. सकाळी साडेआठ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे श्रीमती प्रीतम कस्तुरे, श्रीमती मंजुषा तवटे यांच्यासह स्कुल चे संचालक श्री.नितीन तवटे, श्री.प्रशांत कानडे, श्री.निलेश तवटे, श्री.सागर अंदुरे , मुख्याध्यापक श्री प्रशांत जोशी, शिक्षक पालक समितीचे सर्व सभासद आणि पालकवर्ग हे हजर होते.

प्रमुख पाहुणे श्रीमती प्रीतम कस्तुरे आणि श्रीमती मंजुषा तवटे यांचा सन्मानाने सत्कार करण्यात आला आणि सर्व पाहुणे: व्यवस्थापन सदस्य यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांनी राष्ट्रध्वज फडकवला, विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले. सन्मान आणि अखंडता राखण्याची शपथ घेतली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या बँडसोबत अतिशय आदराने मानवंदना दिली.व विविधरंगी सांस्कृतीक कार्यक्रमास सुरूवात झाली. शाळेतील विविध विद्यार्थ्यांच्या गायन गटांनी देशभक्तीपर समुहगीतगायन, नृत्य, कराटे, योगा आणि मुकनाट्यचे प्रदर्शन सादर केले.

प्रमुख पाहुण्या महोदया श्रीमती प्रीतम कस्तुरे यांनी त्यांच्या भाषणातून सर्वोत्कृष्ट प्रयत्न करण्याचे आवाहन केले.आणि भारतीय असल्याचा अभिमान व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मातृभूमीबद्दलची तळमळ आणि देशप्रेमाने रंगमंचावर देशाभिमान जिवंत केले. इयत्ता सातवीचा विद्यार्थी अभिनव काकडे याने इंग्रजीतून भाषण केले, इयत्ता आठवीची विद्यार्थ्यांनी पल्लवी जायभाये हिने मराठी भाषण केले. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी श्रुती काळे हिचे हिंदीतील प्रेरणादायी भाषणही झाले.

तिरंगी सजावट आणि सुमधुर संगीताने आज शाळेचा मंच भरून गेला होता. याने संपूर्ण प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शेवटी आदरणीय प्राचार्यांनी देशभक्तीपर आणि प्रेरक शब्दांनी संबोधित करताना सांगितले की, आपण आपल्या देशाला आणि आपल्या मातृभूमीला कसे समर्पित राहू शकतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीची विद्यार्थ्यांनी समृद्धी चव्हाण आणि नववीचा विद्यार्थी रयान मकरानी यांनी केले. आभार प्रदर्शन इयत्ता सहावीची विद्यार्थ्यांनी श्रेया सगळे हिने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here