जामखेड तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सुरू.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुका बाळासाहेबांची शिवसेना प्रमुख कैलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनाप्रमुख सुमित वराट व त्यांचे सहकारी जामखेड येथे वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होते. आखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आसुन जामखेड येथिल पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील सेंट्रल कॉम्प्लेक्स या ठीकाणी आसलेल्या युवासेनाप्रमुख संपर्क कार्यालयात सदरचा मदत कक्ष सुरू करण्यात आला आसल्याची माहिती युवासेनाप्रमुख सुमित वराट यांना दिली.

जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्याच्या उद्देशाने जामखेड येथे देखील गरजु व गरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य कक्ष सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षाकडून ज्या मेजर ऑपरेशन्ससाठी अर्थसाहाय्य दिलं जातं त्यात कॅन्सर, ब्रेन ट्युमर,किडनी, लिव्हर इन बोनमॅरो ट्रान्सप्लांट, बायपास, मोतीबिंदू, एनजिओप्लास्टी, कोकलियर इमप्लांट, लहान मुलांच्या हृदयाच्या छिद्रावर शस्त्रक्रिया आदी तत्सम शस्त्रक्रियांचा समावेश आहे. वीस हजारात पासुन ते दोन लाखांपर्यंत हे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून मिळते.

सदरचे मदत कक्ष युवासेनाप्रमुख प्रमुख सुमित वराट यांच्या युवासेना संपर्क कार्यालय जामखेड सेंट्रल कॉम्प्लेक्स पंचायत समिती कार्यालया समोर या ठीकाणी सुरू करण्यात आले आहे तसेच गरजु रुग्णांनी 9004844007 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन  सुमित वराट यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here