

श्री नागेश विद्यालयाचा ‘एन.एम.एम.एस.’ परीक्षेत डंका; ८० विद्यार्थी उत्तीर्ण
आयुष बोधले व संचित खैरे नागेश विद्यालयात प्रथम
जामखेड प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षा (सन २०२५–२६) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेस विद्यालयातील एकूण ९६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या, श्री नागेश विद्यालय, जामखेड ने ‘एन.एम.एम.एस.’ (NMMS) परीक्षा सन २०२५-२६ मध्ये ऐतिहासिक यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ८३.३३% लागला असून, परीक्षेस बसलेल्या ९६ विद्यार्थ्यांपैकी ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागेश विद्यालयात या परीक्षेत आयुष अविनाश बोधले व संचित संतोष खैरे या दोन्ही विद्यार्थ्यांनी १४९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या यशाने जामखेड तालुक्यात विद्यालयाचे नाव पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.

या परीक्षेत विद्यालयातील १३ विद्यार्थ्यांनी १२० पेक्षा अधिक गुण मिळवून घवघवीत यश मिळवले, तर ३३ विद्यार्थ्यांनी १०० पेक्षा जास्त गुणांचा टप्पा पार केला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक आयुष अविनाश बोधले व संचित संतोष खैरे (दोन्ही १४९ गुण) द्वितीय क्रमांक: भोंडवे यश महादेव (१४७ गुण) तृतीय क्रमांक: वराट यशराज शहादेव (१४५ गुण) चौथा क्रमांक: भवर यशराज शंकर (१४४ गुण) तसेच जाधव ओम, वटाणे ओंकार, माळी कृष्णा, धुमाळ सोहम, पवार अथर्व, तिवारी करण, जगताप अनिश आणि रेळेकर श्रेयश या विद्यार्थ्यांनीही १२० पेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशात मार्गदर्शक शिक्षकांचा मोठा वाटा आहे. बुद्धिमत्ता विभागाचे प्रमुख देशमुख एस.एस., विज्ञान विषयाचे मडके बी.के. व पठाण ए.एन., सामाजिक शास्त्राचे लटपटे डी.व्ही. आणि गणित विषयाचे चौधरे ए.बी. यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक मडके बी.के., पर्यवेक्षक जाधवर एस.व्ही., स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र कोठारी हरिभाऊ बेलेकर व विनायक राऊत, शाळा व्यवस्थापन समिती आणि सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे. रयत शिक्षण संस्था आणि जामखेड परिसरातून यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. श्री नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.




