नविन मराठी प्राथमिक शाळेत पेटल्या चुली, आईच्या स्वयंपाकाचे महत्व समजावे यासाठी राबविला उपक्रम

जामखेड प्रतिनिधी

आधुनिक काळात शिक्षणाबरोबरच विद्यार्थींना आईने बनवलेल्या स्वयंपाकाचे महत्व समजावे, मुलांनी देखील घरी आईला मदत करावी, चुलीवर स्वयंपाक बनविताना कती कष्ट घ्यावे लागतात व अन्नाचे महत्व विद्यार्थींना समजावे या मुख्य उद्देशाने जामखेड शहरातील नविन मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता सातवी व आठवी च्या विद्यार्थींनी स्वतः स्वयंपाक बनवण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कैतुक होत आहे.

आधुनिक काळात शिक्षण म्हणजे केवळ डिजिटल तंत्रज्ञान, कॉम्प्युटर आणि स्मार्ट बोर्डपुरते मर्यादित राहिले नसून विद्यार्थ्यांना आपल्या मातीशी, परंपरा आणि संस्कृतीशी जोडणेही तितकेच आवश्यक आहे. हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवत जामखेड शहरातील नविन मराठी प्राथमिक शाळेत एक अनोखा उपक्रम राबवला असून, विद्यार्थिनींना आईने बनवलेल्या स्वयंपाकाचे महत्व समजावे, यासाठी नविन मराठी प्राथमिक शाळेत चुली पेटल्या, यावेळी विद्यार्थींनी स्वतः चुलीवर स्वयंपाक तयार केला, शाळेने व विद्यार्थींनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या उपक्रमा दरम्यान संस्थेचे उमेश काका देशमुख, राजेंद देशपांडे नगरसेवक प्रविण सानप, सोमनाथ पोकळे, केदार रसाळ, नितीन राळेभात यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक प्रविण सानप यांनी शाळेने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच आज आम्हाला एक आगळावेगळा उपक्रम पहायला मिळाला आहे. विद्यार्थींना आईचे महत्व समजावे यासाठी हा उपक्रम घेतला त्यामुळे विद्यार्थी आईला त्रास देणार नाहीत असे वाटते. शाळेचे संचालक उमेश देशमुख यांनी सांगितले की नवीन मराठी प्राथमिक शाळा असे उपक्रम नेहमी राबवते त्यामुळे विद्यार्थ्यांना एक नविन वेगळा अनुभव येतो. यावेळी केदार रसाळ यांनी देखील बोलताना सांगितले की या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाळकडु शिकवले जाते. विद्यार्थ्यांच्या व्यवहारीक ज्ञानात भर पडावी यासाठी एक दिवस कष्टाने पैसै कसे कमवायचे हा उपक्रम शाळेने राबवावा जेनेकरुन विद्यार्थी आई वडिलांनकडे पैशाचा हट्ट धरणार नाहीत.

चौकट

नविन मराठी प्राथमिक शाळा विद्यार्थींच्या सर्वांगीन विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवित असते. याच आनुशंगाने मुलांना अण्णाचे महत्व समजावे, आईने बनवलेल्या स्वयंपाकाची जाणीव व्हावी व मुलांनी घरी स्वयंपाक बनवताना मदत करावी, विषेश म्हणजे चुलीवर स्वयंपाक करताना कीती कष्ट घ्यावे लागतात ही जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

(सौ. मिनाताई राळेभात, मुख्याध्यापिका, नविन मराठी प्राथमिक शाळा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here