जामखेड प्रतिनिधी

दुर्मिळ व संरक्षित जातीचे घुबडाची तस्करी करताना उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम व परांडा तालुक्यातील सहा इसमांना जामखेड पोलीसांच्या पथकाने ताब्यात घेऊन वनविभागाकडे सुपूर्द केले. वनविभागाने वन्य पक्षी तस्करी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. सदर सहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी माहिती दिली की, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की, शहरातील मिलिंदनगर शेजारी असलेल्या नागेश विद्यालयाच्या मोकळ्या जागेत सहा इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत अशी माहिती मिळाली यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पो. कॉ. संदीप आजबे, शेषराव म्हस्के, आबासाहेब अवारे, सचिन राठोड, संग्राम जाधव, अरूण पवार, अविनाश ढेरे यांच्या पथकाने त्या परीसरात छापा टाकून आरोपी हरी नेमीणाथ काळे, रा. सामानगाव ता. भुम, लखन उर्फ लक्ष्मण सतिष भोसले रा. भवन वाडी ता. भुम राहुल निवृत्त पवार व गणेश निवृत्ती पवार दोघे. रा. काशिमबाग. ता. परांडा, दिपक राजाभाऊ गायकवाड रा. सिध्देश्वर नगर, बीड, ज्ञानेश्वर निवृत्ती पवार रा.परांडा जिल्हा उस्मानाबाद या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली आसता त्यांच्या कडे एक पांढर्‍या रंगाच्या पीशवीत बेकायदेशीर रीत्या घुबड जातीचा पक्षी तस्करी च्या उद्देशाने वाहतुक करताना अढळुन आला. यानंतर सदरची घटना वनविभागाच्या अखत्यारीत येत आसल्याने पुढील कारवाई वनविभागाने केली. यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवाड वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे, वनरक्षक के आय पवार, आर एस देवकर, वनरक्षक ताहेर अली सय्यद, के एस गांगुर्डे, पी एस उबाळे, रामभाऊ मुरुमकर, चिलगर, डोंगरे अजिनाथ भोसले, सुरेश भोसले यांच्या पुढील कारवाई करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

पकडण्यात आलेल्या सहा आरोपींनकडे अतिशय दुर्मिळात दुर्मिळ आसे घुबड आढळून आले आहे. त्या घुबडाच्या पायास दहा नखे आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग जादुटोणा करण्यासाठी होऊ शकतो तसेच त्या कारणास्तव या घुबडाची विक्री केल्यास मोठी कींमत मिळते त्यामुळे त्याची तस्करी होत होती असा अंदाज जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here