रोखठोक जामखेड…..
गेल्या आठ वर्षांत जनतेची सेवा करत पिंपरखेड हसनाबाद येथील विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे. त्यामुळे या विकासकामामुळे आमच्या ग्रामविकास अघाडी पॅनलचा विजय निश्चित आहे असे मत पिंपरखेड चे माजी सरपंच बापुराव ढवळे यांनी व्यक्त केले.
पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक रंगात आली आहे माजी सरपंच बापुराव ढवळे यांच्या पिंपरखेड- हसनाबाद ग्रामविकास आघाडी पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ पिंपरखेड येथील ग्रामदैवत बूढनशहा बाबा दर्ग्याच्या आवारात पार पडला.
यावेळी नजीरभाई सय्यद, पृथ्वीराज भोसले, फय्याज शेख, भागवत कदम, राजेंद्र ओमासे, यासीन सय्यद, भागवत ओमासे, आशोक ढवळे, फिरोज सय्यद, अजमेर सय्यद, यांच्या सह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच बापुराव ढवळे म्हणाले की गावात गटातटाचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत भविष्यात गावाचा विकास तालुक्यात आदर्श ठरेल. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात जलसंधारण, ग्रामविकास, ट्रेटलाईट, घरकुलांची कामे, व ग्रामस्थांची कामे प्रामाणिक पणे केली आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ग्रामविकास अघाडी पॅनलचा विजय निश्चित आहे.






