जामखेड रोखठोक….
गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावास १६९ प्रमाणे गुन्ह्यातुन बाहेर काढण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांनी हॉटेल चालकाच्या मदतीने फीर्यादीकडुन तीस हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. यामध्ये हॉटेल चालकासह पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांच्या वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत मिळेलली माहिती अशी की यातील तक्रारदार यांच्या भावास जामखेड गु.र.नं ६९८/२०२० या गुन्ह्यात अटक करून पोलीस कस्टडी रीमांड घेतली आहे. यानंतर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावास १६९ प्रमाणे गुन्ह्यातुन बाहेर काढण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे एक लाखांची मागणी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांनी केली होती. यानंतर तडजोडीअंती तीस हजार रुपये देण्याचे ठरले. तसेच हे पैसे आरोपी नं दोन तुकाराम ढोले याच्या कडे हॉटेल कृष्णा येथे देण्यात सांगितले. मात्र फीर्यादी याने पैसे देण्याच्या आगोदर दि ४ जानेवारी रोजी अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्या नुसार आज दि ५ जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाने जामखेड पोलीस स्टेशनला येऊन लाचे बाबत खात्री करून घेतली त्यानुसार लाचेची मागणी करण्यात आली आसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर दि ५ जानेवारी रोजी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगररोड वरील हॉटेल कुष्णा या ठिकाणी सापळा लावला. त्या नुसार हॉटेल कुष्णा येथे तक्रारदार यांच्या कडुन तुकाराम ढोले यांच्याकडे तीस हजार रुपयांची रक्कम देताना रंगेहाथ पकडले. तसेच त्याच्या कडे चौकशी केली असता ती रक्कम पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांच्या सांगण्यावरून घेतली आसल्याचे सांगितले. त्या नुसार तातडीने जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी तुकाराम ढोले रा मोरे वस्ती जामखेड व जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे, हेडकाँस्टेबल तन्वीर शेख, पोलीस नाईक प्रशांत जाधव, पो. कॉ. रविंद्र निमसे, पो. कॉ. वैभव पांढरे यांच्या पथकाने केली.




