जामखेड रोखठोक…..
कोरोना महामारी, अतिवृष्टी मुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान या मुळे आधीच आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला आर्थिक फटा देत प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या प्रयत्नातु तालुक्यातील धोंडपारगाव ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात यश आले.
गेल्या आकरा महिन्यापासून कोरोना महामारी व चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. पुन्हा निवडणुकीत नुकसान होऊ नये तसेच गाव तंटामुक्त करण्यासाठी गावातील लोकांचे ऋणानुबंध राहण्यासाठी गावातील सर्वाशी विचारविनिमय करून धोंडपारगाव ग्रामपंचायत बिनविरोध काढली आहे अशी माहिती प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते संतोष पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या मध्ये बिनविरोध झालेले ग्रामपंचायत सदस्य पुढील प्रमाणे आहेत. १ ) कैलास शिंदे 2 ) दत्ता शिंदे ३ ) बळीराम शिंदे ४ ) अवधुत शिंदे ५ ) दादा साळवे ६ अमोल शिंदे ७) रवि शिंदे असे सदस्य आहेत. धोंडपारगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते संतोष पवार, माजी सरपंच हनुमंत शिंदे, माजी सरपंच सुखदेव शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोरख शिंदे व राजेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही बिनविरोध झाली आहे. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी उपसरपंच गोविंद शिंदे, अमोल शेठ शिंदे, लालासाहेब शिंदे, विकास साळवे, अंकुश शिंदे, संतोष गव्हाळे, सुरज पवार, राणा सदाफुले, युवराज डाडर, सपंतनाना राळेभात, किरण शिंदे, पवनराजे राळेभात, रवी शिंदे, भरत राळेभात गोरख शिंदे, दिपक शिंदे, विकास शिंदे, बापू महाराज शिंदे, दिंगाबर शिंदे, राजेंद्र शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.