येवला ते गाणगापुर सायकल रॅलीचे जामखेड येथे स्वागत, दोन न्यायाधीशांचा सायकल रॅलीत सहभाग

जामखेड (प्रतिनिधी) जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड आयोजित जय भवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था,पिंपळगाव जलाल (ता. येवला ) ते अहमदनगर, जामखेड, खर्डा, येरमाळा, तुळजापूर , अक्कलकोट ते गाणगापूर सायकल यात्रेचे जामखेड येथे ( वर्ष १७ वे) स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे या रॅलीत दोन न्यायाधीशांच ससहभागी झाले होते.

यावेळी बीडचे जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके, जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश विक्रम आव्हाड , न्यायाधीश बाळासाहेब पवार , राष्टवादीचे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, संजय नहार, डॉ भरत दारकुंडे, जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी ,सुनील कोठारी, सुभाष भंडारी, कुंदनमल भंडारी, किसन चिंतामणी, दिगंबर चव्हाण अमित जाधव, अशोक निमोणकर ,नासिर पठाण ,सचिन गाडे, दीपक भोरे, मयूर भोसले, आदित्य मंडलेचा, रोहन कोठारी उपस्थित होते.

जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके म्हणाले, सायकल चालवणे ही एक कलाच आहे, महत्त्वाचे म्हणजे काल ११४ किलोमीटर अंतर पार करून, हे सर्व सायकलस्वार येवला ते अहमदनगर पर्यंत आले आणि आज ८० किलोमीटर अंतर पार करून नगरहून जामखेड पर्यंत आले आहे.

यावेळी बोलताना न्यायाधीश विक्रम आव्हाड, गेली सोळा वर्षापासून आम्ही जामखेडला येत आहोत. आज आमचे १७ वे वर्ष आहे. पहिल्या वेळेपासून आम्हाला सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी मदत करतानाच आमचे स्वागत करत असतात. संजय कोठारी यांच कार्य मी नेहमी पाहत असतो कोरोना काळामध्ये त्यांनी जनावरांना सुद्धा चारा देऊन मोठे काम केले. कोरोना काळामध्ये त्यांनी अपघातातील लोकांना वाचवले.

यावेळी बोलताना न्यायाधीश बाळासाहेब पवार म्हणाले मी सध्या हिंगणघाटला असून, माझा पहिलाच प्रवास आहे. पहिल्या दिवशी मी ११४ किलोमीटर सायकल चालवली. आज ८० किलोमीटर अंतर बरोबर आलो. मला कसलाच त्रास झाला नाही ही या लोकातून मला मिळालेली प्रेरणा आहे. जगात सर्वात मोठे जिजाऊ जिजामाता रेखाचित्र तयार करणारे उद्देश पघळ, तालुक्यातील जवळा येथील अंकिता मंडलेचा – जैन सीए परीक्षेत पास झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

गेली सतरा वर्षापासून उच्चशिक्षित असलेले डॉ. विक्रम आव्हाड न्यायाधीश हे येत आहेत दोन वर्षापासून ते सपत्नीक या सायकल रॅलीमध्ये असतात. हे प्रत्येक वेळेस वृक्षारोपण करून लोकांना वृक्षारोपांचे महत्त्व पटवून सांगतात तसेच सायकल रॅलीमुळे प्रदूषण होत नाही इंधन कमी लागते आणि शारीरिक व्यायाम होतो हे सुद्धा यातून कळून संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

या कार्यक्रमाचे नियोजन जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत जामखेड महावीर भवन येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदनमल लालचंद भंडारी यांनी केले, तर आभार संजय कोठारी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here