वन विभागाच्या परवानगी अभावी प्रलंबित असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजना पूर्ण होण्याचा मार्ग सुकर

आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने अखेर वनविभागाने दिला हिरवा कंदील; आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरवात

कर्जत | कर्जत तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होते. यामुळे योजना मंजूर असतानाही काम पूर्णत्वास जाण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. कर्जत तालुक्यातील मौजे बिटकेवाडी येथे जमिनी अंतर्गत पाण्याची पाईपलाईन वनक्षेत्रातून जात असल्यामुळे वनविभागाच्या परवानगी अभावी ही योजना 40 टक्के काम पूर्ण झाले असतानासुध्दा परवानगी मिळाली नसल्याने प्रलंबित होती. परंतु आता वन विभागाने परवानगी दिली असून त्यामुळे तुकाई चारी पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

तुकाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत 23 पाझर तलाव पुनर्भरण व सिंचन वापरासाठी प्रस्तावित होते. या योजनेत तत्कालीन भाजप शासन काळात गायकरवाडी, खंडाळवाडी, वाघनळी, पाटेगाव खालील चांदे बुद्रुक या चार तलावांचा योजनेत समावेश न झाल्यामुळे पुनर्भरण व वापरास परवानगी मिळालेली नव्हती व तूकाई उपसा सिंचन राखीव वनातील काही क्षेत्रे संपादित होणे असल्यामुळे वनविभागाची संमती देखील प्राप्त होणे आवश्यक होते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन लोक प्रतिनिधींनी घाईगडबडीने निधी मंजूर केला पण त्याला लागणाऱ्या प्राथमिक परवानग्या मात्र त्यांनी घेतल्या नाहीत. जसे की वनविभागाची परवानगी घेतली नव्हती ज्याला परवानगीसाठी जास्त वेळ लागतो. परंतु रोहित पवार यांनी त्यावेळी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही अनेक बैठका घेतल्या व पाठपुरावा केला आणि सर्व परवानग्या आणण्याचे महत्त्वाचे काम पार पाडले त्यानंतर काम सुरू झाले.

वन्यजीव विभागाची परवानगी मिळण्यासाठी बहुतांश वेळा मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात. परंतु, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रलंबित असलेल्या तुकाई चारीच्या विषयासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेऊन तसेच समक्ष पाहणी करून व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांची भेट घेऊन पाठपुरावा केल्यानंतर अखेर 11 जानेवारी 2023 रोजी महसूल व वन विभाग उपवनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडून सदरील कामाला मान्यता मिळाली असून मंगळवारी त्याच्या प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे त्यामुळे आता 40 टक्के काम पूर्ण झाले असताना थांबलेले पुढील काम देखील सुरू करण्यात आले आहे.

आता वन विभागाची परवानगी मिळाल्याने तुकाई उपसा सिंचन योजना पूर्णत्वाकडे जात असून या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील तीन लघु पाटबंधारे प्रकल्प व 24 पाझर तलाव कुकडी कालव्यामधून पाणी उपसा करून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे भरून देण्याचे प्रयोजन असल्यामुळे कर्जत तालुक्यातील 19 गावांचा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया

विविध विभागांची परवानगी न घेतल्यामुळे ही योजना पूर्वी रखडली होती. पण याबाबत मी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून आता ही योजना पूर्णत्वास जात असल्याचे पाहून मनापासून आनंद वाटतो. कुठलाही प्रकल्प राजकीय द्वेशातून आम्ही थांबवत नसतो. उलट सत्ता असताना अधिकची आर्थिक ताकद विविध योजनांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही दिली आहे. पण आताचं द्वेषाचं राजकारण बघितल्यानंतर मनापासून खंत वाटते.

आ. रोहित पवार , (कर्जत-जामखेड विधानसभा)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here