जामखेड रोखठोक…
जामखेड पोलिस स्टेशन आयोजीत पोलीस रेझिंग डे ( पोलीस स्थापना दिन) सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या निमित्ताने जामखेड पोलिस स्टेशन मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांना व छात्र सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण व पोलिस कामकाज विषयी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस नाईक रमेश फुलमाळी यांनी शॉर्ट गन, एस.एल.आर, अशा विविध शस्त्रांची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी शस्त्र हाताळणी आणि जोडणे याचे प्रात्यक्षिक केले. या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड साहेब ,नागेश विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ ढवळे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, ज्ञानेश्वर लटपटे ,संभाजी इंगळे,रणदिवे सर,पो नाईक रमेश फुलमाळी,पो कॉ अविनाश ढेरे,आदी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्थापना दिवस माहिती तसेच पोलीस स्टेशन मधील ठाणे अंमलदार, गोपनीय विभाग, मुद्देमाल कारकून, वायरलेस विभाग, वाहतूक ,बारणीशी विभाग ,ए.पी. आय. पी. एस. आय. पी.आय.यांचे कार्य तसेच पोलिसांचे कार्य, दैनंदिन नोंदी याविषयी सविस्तर सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले. अडचणीच्या काळात जो आपल्याला मदत करतो तो आपला मित्र असतो, अशा अडचणीच्या काळात पोलिस सर्वांना मदत करतात म्हणजेच पोलिस आपले मित्र आहेत असे विद्यार्थ्यांना सांगितले. शेवटी नागेश विद्यालयाच्या वतीने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.आभार प्रदर्शन एनसीसी ऑफिसर मयुर भोसले यांनी केले.