अरणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारा विरोधात सदस्यांचे आमरण उपोषण सुरू

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मागण्या करुन देखील प्रशासनाने दखल घेतली त्यामुळे आज दि 9 रोजी आरणगाव येथिल चार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सादीक शेख आसे पाच जण आमरण उपोषणास बसले आहेत.

जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतचे सदस्या रब्बाना सादिक शेख, रुपाली शंकरराव गदादे- गजराबाई चंद्रकांत पारे, तात्यासाहेब बलभीम निगुडे या चौघा सदस्य व ग्रामस्थ सादीक शेख हे पाच जण उपोषण बसले आहेत. या उपोषणास राष्ट्रवादीचे युवा नेते शंकर गदादे, सादीक शेख संतोष निगुडे प्रविण निगुडे अंगद निगुडे धीराज राऊत रमेश सोनवणे अंकुश गवळी देवा निगुडे राजु नन्नवरे रवी भोगे संतोष कोथमिरे शकुंतला निगुडे रामदास गदादे नवनाथ ससाणे परमेश्वर निगुडे अमिर शेख यांनी देखील उपोषणास्थाळी भेट देऊन पांठीबा दिला आहे.

सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत सदरचे उपोषण सुरू केले आहे त्यांनी आपल्या मागण्यांमध्ये म्हंटले आहे की १. अरणगाव येथील पाणी पुरवठा महिन्याला एकदा होत आहे पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे तो सुरळीत करण्यात यावा.

२. मागील चार महिन्या पासून सरपंच व ग्रामसेवक मासिक मीटिंग न घेता मनमानी कारभार करत आहेत त्यांची चौकशी लावून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

३. माहितीचे अधीकार अर्ज देऊन, अपील करून देखील नियमभंग करून माहिती देण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करत आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

४. मासिक मीटिंग न घेता किंवा कोणत्याही मासिक मीटिंगमध्ये ठराव न घेता बोगस कामे दाखवून ग्रामपंचायतच्या खात्यात रक्कम उचलण्यात आलेली आहे, त्याची चौकशी करुन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

५. अरणगाव पशु वैद्यकीय अधिकारी कायम गैरहजर असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे, म्हणून त्यांना गाव देऊन कायम हजर राहण्याबाबत आदेश द्यावेत.

६. अरणगाव येथील शासकीय विहिरीवरील गौण खनिज चोरी केल्या बाबत आपल्या कडील तक्रारीची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

७. पारेवाडी स्मशानभूमी येथील गौण खनिज उत्खनन झाल्याचे सिद्ध झालेले आहे व दोषींना तहसीलदार साहेब यांनी दंड देखील अकारलेला आहे, परंतु राजकीय दबावापोटी संबधितांकडून अजून देखील दंड वसूल करण्यात आलेला नाही, तो लवकरात लवकर वसूल करण्यात यावा.

८. अरणगावचे ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभार, सतत गैरहजर, नियमबाह्य काम इत्यादी वेळोवेळी लिखीत तक्रारी करून देखील त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही, त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी सदरचे उपोषण सुरू आहे.

उपोषण स्थळी मंडल अधिकारी बाळासाहेब लटके, तलाठी सुर्यकांत सरोदे, पोलीस पाटील दत्तात्रय निगुडे, यांनी भेट घेऊन चर्चा केली. मात्र महसुल विभागाच्या तोडीं अश्वासनावर उपोषणकर्त्यांचे समाधान झाले नसल्याने उपोषण सुरूच राहीले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here